Ticker

6/recent/ticker-posts

नांदेडमद्धे कोरोना रुग्णसंख्या एक हजाराच्या उंबरठ्यावर.. जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच. मागील 24 तासात आढळले 51 रुग्ण पॉझिटिव्ह तर तिघांचा झाला मृत्यू.



नांदेडमद्धे कोरोना रुग्णसंख्या एक हजाराच्या उंबरठ्यावर..
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच.
मागील 24 तासात आढळले 51 रुग्ण पॉझिटिव्ह तर तिघांचा झाला मृत्यू.
रुग्णसंख्या पोहचली 986 वर.


नांदेड-
नांदेडमद्धे कोरोना रुग्णांचे तांडव सुरूच असून मागच्या 24 तासांमध्ये तब्बल 51 रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.नांदेडमद्धे संचारबंदीच्या काळातही कोरोना रुग्णाचे थैमान वाढत असल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण असून दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 986 वर पोहचली आहे. आज 15 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आज दोघांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 49 एवढी झाली आहे.

      आज प्राप्त झालेल्या 332 नमुने तपासणी अहवालापैकी पैकी 223 नमूने निगेटीव्ह आले आहेत. तर 52 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 986 झाली आहे. आजवर डिस्चार्ज झालेले रुग्ण 515 असून उपचार घेत असलेले रुग्ण हे 424 आहेत. सद्यस्थितीत प्रलंबित असलेल्या स्वॅबची संख्या 98 एवढी आहे. दररोज वाढत असलेल्या शहरी रुग्णसंख्या बरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव मोठ्या झपाट्याने होत असल्याने प्रशासनाची व नांदेडकरांची डोकेदुखी वाढली आहे.


*दिपक इरमलवार*
*AM NEWS*
*नांदेड.*