Ticker

6/recent/ticker-posts

किनवट :(प्रतिनीधी) येथील किनवट नगरपरिषद अंतर्गत वस्तीवाढ झाल्याने प्रभाग क्र.3 मधील धोबीगल्ली, भोईगल्ली, रामनगर तर प्रभाक क्र.1 मधील कंधारवाडी, नालागड्डा, मोमिनपुरा येथे विद्युत पोल बसवा अश्या आशयाची मागणी करणारे पत्र विद्युत व्यवस्थापक किनवट यांना दि.24 रोजी नगरसेविकेनी दिले.





प्रभाक क्र.3 व  प्रभाक क्र.1  मध्ये वस्तीवाढ झाल्याने विद्युत पोल बसवा - नगरसेविका.


किनवट :(प्रतिनीधी)
            येथील किनवट नगरपरिषद अंतर्गत  वस्तीवाढ झाल्याने प्रभाग क्र.3 मधील धोबीगल्ली, भोईगल्ली, रामनगर तर प्रभाक क्र.1 मधील कंधारवाडी, नालागड्डा, मोमिनपुरा  येथे विद्युत पोल बसवा अश्या आशयाची मागणी करणारे पत्र विद्युत व्यवस्थापक किनवट यांना दि.24 रोजी नगरसेविकेनी दिले.
        किनवट शहरातील धोबीगल्ली, भोईगल्ली, रामनगर, कंधारवाडी, नालागड्डा, मोमिनपुर येथील परिसरात नवीन वस्ती वाढ झाली आहे. परंतु त्या ठिकाणी विद्युत पोल अद्यापही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे तेथील नागरिकांना अंधाराच्या ठिकाणी राहावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे साप व विंचू निघण्याचे प्रमाण वाढले असून नागकीकांना अंधारात पायपीट करावी लागते. त्यांच्या दंशामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा या आरक्षित प्रभागात वस्तीवाढ असणाऱ्या ठिकाणी एकुुण 14  विद्युत  पोलची आवश्यकता असून  नवीन विद्युत खांब बसवण्यात यावे अशा आशयाचे पत्र प्रभाग क्र. 3  अनिता शिवा क्यातमवार प्रभाग क्र. 1 मधील  जिजाबाई सखाराम मेश्राम या नगरसेविकांनी  विद्युत व्यवस्थापक व कार्यकारी अभियंता यांना दिला आहे. लवकरात लवकर  या भागामध्ये विद्युत पोल बसविण्यात येतील अशी ग्वाही यावेळी  विद्युत व्यवस्थापकांनी दिल्याचे नगरसेविकेनी सांगीतले आहेे; तर आपल्या प्रभागात जास्तीत जास्त सुविधा देण्याचा सतत प्रयत्न करणाऱ्या या नगरसेविके प्रती नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.