Ticker

6/recent/ticker-posts

वृत्त क्र. 620 मिशन ब्रेक द चेन अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाय योजनेची कडक अंमलबजावणी




मिशन ब्रेक द चेन अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाय योजनेची कडक अंमलबजावणी 

नांदेड (जिमाका) दि- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात मिशन ब्रेक द चेन अंतर्गत ( Mission break the chain ) आदेश निर्गमीत केले आहेत. या आदेशाची जिल्हाभर कडक व काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून दोषींविरुद्ध तात्काळ कारवाई केली जाईल.  

आज निर्गमीत केलेल्या आदेशान्वये 31 जुलै 2020 पर्यंत नांदेड जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्याe अधिन राहून आस्था्पना व दुकाने केवळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंतच चालू ठेवण्याधस मुभा देण्यानत आली आहे. अत्यावश्यक साधने व सुविधा यांनी साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध सर्वसंबंधित यंत्रणांमार्फत कठोर कारवाई केली जाईल.  

नांदेड जिल्हयात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांवची संख्याा विचारात घेता निर्गमीत आदेशाची काटेकोर अंमलबजावणी काही ठिकाणी होत नसल्यादचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. याचबरोबर काही लोक दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन करत असल्याने जनतेमधूनही दिलेली शिथीलता पुर्णता बंद करुन 100 टक्के ताळेबंदी करण्यालची मागणी होत आहे. या बाबीचा गांभीर्याने विचार करुन जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या निर्देशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी खास पथके तयार करुन ठिकठिकाणी तपासणी पथक निर्माण केली आहेत. या पथकांमार्फत जिल्ह्यात सर्व निर्देशाचे तंतोतंत पालन जर कोणी केले नाही तर अशा तपास पथकांना आढळलेल्या व्यक्तीविरुद्ध आवश्यक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी निश्चित केली आहे. 

महानगरपालिका हद्दीत आयुक्त नांदेड, पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी नांदेड. नगरपालिका-नगरपंचायत हद्दीत उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, मुख्यारधिकारी, पोलीस निरीक्षक. ग्रामपातळीवर ग्रामपंचायत, तलाठी, पोलीस, कृषी सहाय्यक इत्या दींचा नवीन निर्माण केलेल्या वेगवेगळ्या पथकात समावेश राहील.  

सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीमध्ये जर दुचाकीवर एक व्यनक्तीा पेक्षा अधिक व्यकक्तीम आढळल्यािस 500 रुपये पर्यंत दंड व मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनूसार इतर दंड व कारवाई केली जाईल. तीन चाकी रिक्षा व इतर वाहनात तीन व्यवक्तीक पेक्षा अधिक व्य‍क्तीे आढळल्याळस 1 हजार रुपये पर्यंत दंड व मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनूसार इतर दंड व कार्यवाही केली जाईल. चार चाकही वाहनामध्ये तीन व्य क्तीी पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्याईस 1 हजार रुपये दंड, व मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनूसार इतर दंड व कार्यवाही. सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क् परिधान न केल्यास व  सामाजिक अंतराचे पालन न केल्यास, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्या्स 1 हजार रुपये  दंड ठोठावला जाईल. ताळेबंदीच्याद कालावधी मुभा देण्यात आलेल्या् विविध दुकानात पाच पेक्षा जास्त  ग्राहक, दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्या  चेहऱ्यावर मास्कि, सामाजिक  अंतराचे पालन न झाल्यााचे आढळून आल्यायस रुपये 5 हजार रुपये पर्यंत दंड व सदरचे दुकानही पुढील पाच दिवसासाठी सिल करण्या्त येईल. 
हातगाडेवरती फळ व भाजी विक्री तसेच इतर मुभा दिलेली वस्तू  विक्री करणाऱ्यांना एकाच ठिकाणी थांबवून  विक्री न करता त्यांइना मुभा दिलेल्याू वेळेत गल्लीय, कॉलनी, सोसायटीमध्ये् जावून विक्री करावी. एकाच  ठिकाणी त्यांनी थांबवून विक्री केल्या स अशी वाहने, हातगाड्यांना  1 हजार रुपये दंड व वेळ प्रसंगी जप्तीनची कार्यवाही सुध्दा करण्याात येईल. अंतरराज्यन सिमेतून केवळ वैद्यकीय, अत्यंेत तातडीच्यार कारणासाठी परवाना घेतलेल्याा व्य क्तीं ना व मालवाहतूक वाहनांनाच प्रवेश असेल.
ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात परदेशातून, परराज्यानतून व जिल्हीयाबाहेरुन प्रवास करुन आलेल्याठ व्यरक्तीकच्याे बाबतीत यापुर्वी गठीत केलेल्याल अॅन्टीह कारोना कवच / फोर्सद्वारे खालील प्रमाणे कार्यवाही अनुसरण्यालत यावी. यात अशा व्यबक्तीीची वैद्यकीय पथक येईपर्यंत गावातील समाज मंदिर, शाळा इत्यावदी वेगळ्या ठिकाणी ठेवण्यातची व्ययवस्थात करावी. सदर व्येक्तींलची तात्का,ळ सबंधित वैद्यकिय अधिकारी यांचेमार्फत तपासणी करुन घेण्याेत यावी. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याई सल्या‍नूसार, सदर व्यचक्तीास प्रादुर्भावाची लक्षणे दिसून आली नसल्याअस त्याअस गृह अलगीकरण करावे किंवा तशी व्यवस्था नसल्याास त्या‍स नजीकच्याच कॅम्पआमध्ये  किंवा गावातील समाज मंदिर, शाळा याठिकाणी राहण्याेची व जेवणाची व्य्वस्थास करावी. तपासणीमध्ये प्रादुर्भावाची लक्षणे किंवा संशयास्प द स्थिती आढळून आल्याास त्यांचना तात्काथळ शासकिय विलगीकरण केंद्रात दाखल करावे.
जिल्हचयातील सर्व खाजगी रुग्णाशलयात तसेच गल्लीरतील, कॉलनीतील व वसाहतीमधील जनरल फिजीशन यांनी त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्याा रुग्णांमध्येा कोव्हिड-19, सारी व ILI (Influanza like illness ) सारखे लक्षण दिसून आल्या स तात्कालळ नजीकच्याा आरोग्य् अधिकाऱ्यांना माहिती देवून सदर व्यnक्ती स पुढील उपचारास त्यांाचेकडे पाठवावे. असे न केल्याआचे आढळून आल्याऱस सबंधित डॉक्ट र विरुध्दn नियमानुसार  कार्यवाही अनुसरली जाईल. रस्याावे वर, सार्वजनिक ठिकाणी विनाकारण व्याक्तीत, व्यzक्तींlचा समुह वावरत, फिरत असल्या चे दिसून आल्यालस  त्यांॉच्या विरुध्दि भारतीय दंड संहिता 188 व इतर अधिनियमानुसार शिक्षेस पात्र धरले जाईल.  
वरिल प्रमाणे नमूद सर्व कार्यवाहीचे पर्यवेक्षणाचे काम कार्यक्षेत्राप्रमाणे सबंधित स्थाानिक स्वाराज्यण संस्था् प्रमुख, पोलीस विभाग, आरोग्यक विभाग, महसूल विभाग  यांची राहिल.  या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्यास कृत्याकसाठी कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्दन कुठल्यााही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यारच्याख अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हाणून 7 ते 12 जुलै 2020 पर्यंत वरील पथकामार्फत कडक अंमलबजावणी करण्या त यावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहे.
00000