Ticker

6/recent/ticker-posts

बीजेपी की ओर से नगर पालिका में मास्क दिए गए हैं




भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांच्या कडून भाजप चे संस्थापक सदस्य व ज्येष्ठ नेते स्व.नारायणराव नेम्मानिवार यांच्या स्मरणार्थ कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी झटत असलेल्या कोरोना वारीयर्स सफाई कामगार व नगर परिषद कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम - 30 या रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या गोळ्यांचे माननीय आ.भीमराव केराम यांच्या हस्ते  वाटप करण्यात आले. 
कार्यक्रमाच्या सुरवातीला स्व.नारायणराव नेम्मानिवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर डॉ सुरेंद्र जन्नावार यांनी कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती खबरदारी घेतली गेली पाहिजे व आर्सेनिक अल्बम-30 ह्या गोळ्या कशा घ्यायच्या याबाबत माहिती दिली तर आ.भीमराव केराम यांनी स्व.नेम्मानिवार यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला आणि कोविड योद्धाचे प्रशंसा करुण काळजी घेण्याचा सल्ला दिला तर यावेळी ता.अध्यक्ष संदीप केंद्रे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजप नेते अनिल तिरमनवार, संतोष चनमनवार, नरेंद्र सिरमनवार, शिवा क्यातमवार, बालाजी धोत्रे,  विश्वास कोल्हारिकर , लक्ष्मण नेम्मानिवार, नरसिंग तक्कलवार,कृष्णा बासटवार, गौरव इटकेपल्लीवार, फजल चव्हाण, जावेद खान, अशोक एंड्रालवार, यांची उपस्थिती होती तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे, सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते तर कार्यक्रमाची प्रस्तावना शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी केली तर आभार विश्वास कोल्हारीकर यांनी मानले.