Ticker

6/recent/ticker-posts

प्रीतम ताई मुंडे किसानों के लिए बीड जिले मे क्या किया




बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याचे संरक्षण मिळावे याकरिता मी वारंवार प्रयत्न करत आहे.जिल्ह्यासाठी विमा कंपनी नियुक्त करण्यात यावी या अनुषंगाने मी यापूर्वीही प्रधानमंत्री कार्यालयासह केंद्रीय कृषीमंत्री,मुख्यमंत्री व राज्याचे कृषीमंत्री यांच्याशी पत्र व्यवहार केला होता.

आज केंद्रीय कृषीमंत्री श्री.नरेंद्रसिंग जी तोमर यांची दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन बीड जिल्ह्यासाठी विमा कंपनी नियुक्त करण्यात यावी अशी मागणी त्यांच्याकडे केली.बीड जिल्ह्यासाठी विमा कंपनी नियुक्त करण्यात आली आहे असा दावा काही लोकांकडून होत असला तरी अशा प्रकारचा कोणताही आदेश दिला असल्याचे ज्ञात नाही.

या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय कृषीमंत्री श्री.नरेंद्रसिंग तोमर यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याचे संरक्षण मिळवून देण्याकरिता विमा कंपनी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली.माझ्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना “निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी काही विमा कंपन्यांशी चर्चा करून आपल्या स्तरावर सकारात्मक पावले उचलली जातील" असे आश्वासन मा.मंत्री महोदयांनी दिले.

केंद्रीय कृषीमंत्री मा.नरेंद्रसिंग तोमर यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनाने माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल हा विश्वास आहे.

*खा.डॉ.प्रितम गोपीनाथ मुंडे*