आदिवासी, नक्षलग्रस्त क्षेत्रातील जि.प.शिक्षकांना भाडेमाफ निवासस्थान सुविधा लागू करावे.
किनवट : (नसीर तगाले)
आदिवासी, नक्षलग्रस्त क्षेत्रातील जि.प.शिक्षकांना भाडेमाफ निवासस्थान सुविधा लागू करावे या व इतर मागण्यांचे निवेदन दि.12 रोजी आमदार भीमराव केराम यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ किनवट तर्फे सादर करण्यात आले.
आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये नियुक्त झालेल्या किंवा बदली झाल्याने पदस्थापना करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लागू असलेल्या प्रचलित सवलती व सुविधांचा अभ्यास करून कालानुरूप बदललेल्या परिस्थितीचा विचार करून आर्थिक, बिगर आर्थिक सवलतीचा अभ्यास केला असून शासनास शिफारस करण्याकरिता विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने शासन दरबारी अहवाल सादर केला आहे. या अहवालाचे शासन निर्णयात रूपांतर करावे . या वरील दोन्ही निवेदना विषयी आ. केरामांनी जाणून घेतले. या मागणीचा पाठपुरावा करून सर्व कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात येईल असे आश्वासन या वेळी दिले.
या प्रसंगी,आ.म.प्रा.शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष अनिल गुंजकर, सरचिटणीस पुनाराम जाधव, तालुका उपाध्यक्ष अमोल उत्तरावर व बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ किनवटचे तालुकाध्यक्ष कौतुक मुनेश्वर हे उपस्थित होते.