किनवट(नसीर त गा ले ) दि १८ नांदेड जिल्ह्यात लागु केलेली संचारबंदी ही अत्यंत आवश्यक असुन ती आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे त्या बाबत जिल्हा प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा असे मत किनवट माहुर विधानसभा क्षेत्राचे माजी आ.प्रदीप नाईक यांनी मांडले आहे.
याबाबत पत्रकारांशी दुरध्वनी वरुन संपर्क साधत त्यांचे आपले म्हणने मांडले आहे तर कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावा बाबत त्यांनी बोलतांना सांगितले कि, किनवट माहुर तालुक्याती परिस्थिती आता पर्यंत चांगली आहे राज्यातील इतर ठीकाणच्या परिस्थितीशी तुलना केली तर किनवट माहुर च्या जनतेनी कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाला उत्कृष्ठ पध्दतीने हाताळाले आहे. ग्रामिण भागातील जनतेने बाहेर जिल्ह्यातुन आलेल्या गावक-यांची योग्य काळजी घेतली आहे व त्यांच्या राहण्याची व खाणपानाची योग्य व्यवस्था कोरोनटाईन सेंटर मध्ये केली होती त्यामुळे सगळीकडे रुग्णाची संख्या वाढत असतांना किनवट माहुर तालुक्यात ती संख्या नियंत्रणात आहे.
मात्र नांदेड शहरातुन दररोज ४० रुग्न किंवा त्यापेक्षा जास्त रुग्न संख्या निघत असल्याने व नांदेड मध्ये कोन्टोंमेंट झोन ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे जिल्ह्याच्या ठीकाणचा संपर्क हा ग्रामिन भागातील जनते सोबत येतोच त्यामुळे मागील दोन आठवड्यापासुन ग्रामिण भागातुन रुग्णांची नोंद मोठ्या प्रमाणात होऊ लागली त्यामुळे योग्य वेळी जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागु केली ज्याची नितांत आवश्यकता होती. हे ही मान्य आहे कि यामुळे अनेकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे परंतु “सिर सलामत तो टोपी हजार” या हिंदीतील म्ह्णी प्रमाणे मानवाने यावर्षी जिवंत राहण्याचा प्रयत्न करावा दोन पैसे कमी मिळतील परंतु आरोग्य जपले पाहिजे व मे महिण्यात जागतिक आरोग्य संघटनेने अंदाज वर्तवला होता कि भारतात जुलै महिना अत्यंत महत्वाचा राहणार आहे त्यामुळे नागरीकांनी हा काळ घरा बाहेर न पडता काढावा व आपले आरोग्य सांभाळावे. त्या विशेष वयोवृध्द नागरीक, ज्यांना मधुमेह आहे, जे ह्रुद्य रोगी आहेत त्यांनी यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नागरीकांनी योग व आहारातील संतोलन ठेवुन आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवावी जेणे करुन कोरोना नावाच्या संकटाशी तन, मन, धन लावुन आपणाला मुकाबला करता येईल.
तालुक्यातील आरोग्य प्रशासनाने, पोलिस प्रशासनाने, महसुल प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली आहे तर २० जुलै पर्यंत लागु करण्यात आलेली संचारबंदी आणखी वाढवण्यात यावी असे मत ही त्यांनी मांडले आहे तर नागरीकांनी संचारबंदी च्या काळात विना कारण बाहेर पडु नये, तोंडाला मास्क लावावा, नेहमी हाथ स्वच्छ धुत रहावे व शक्य असल्यास सॅनिटायझरचा वापर करावा असे ही आवाहन मा.आ.प्रदिप नाईक यांनी केले आहे.