Ticker

6/recent/ticker-posts

निरंतर शिक्षण प्रक्रिया सुरू राहण्यासाठी दुरदर्शनवरील 'टिली मिली' कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा -गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने





निरंतर शिक्षण प्रक्रिया सुरू राहण्यासाठी दुरदर्शनवरील 'टिली मिली' कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा
-गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने


किनवट : कोरोनाच्या प्रादुर्भावात सारं काही ठप्प झालेलं असतांना घरोघर निरंतर शिक्षण प्रक्रिया सुरू राहण्यासाठी दुरदर्शनवरील 'टिली मिली' कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी केले आहे.
                 कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र हाहाःकार उडाला. सर्व जग ठप्प झालं. सर्व उद्योग, व्यवसाय व ईतर सर्व बाबी थांबल्या. के.जी. ते पि.जी. पर्यंतच्या सर्व शैक्षणिक संकुलास कुलूपबंद व्हावं लागलं. अशाही परिस्थितीत शिक्षण विभागातील सुज्ञांनी व तज्ज्ञांनी " शाळा बंद पण शिक्षण सुरू " ही मोहिम आखून ऑनलाईन शिक्षण देण्यास प्रारंभ केला. अतिदुर्गम, आदिवासी, डोंगरी भागात नेटवर्क पोहचले नाही. तसेच बहुतांशी पालकांकडे अॅन्ड्राईड मोबाईल नाही. यामुळे या पद्धतीला मर्यादा आल्यात. परंतु वाडी - तांडा, पाड्या -गुड्यापर्यंत टी.व्ही. पोहचला आहे. याचा विचार करून दूरदर्शनवर सर्वच वर्गाच्या अभ्यासक्रमाचा  'टिली मिली ' कार्यक्रम सुरू केला आहे. सह्याद्री वाहीनीवर हा कार्यक्रम पाहतांना ग्रामीण भागात वीज गेल्यास
https://bit.ly/2Qhzvaq ही लिंक मोबाईलवर टाकुन हा अभ्यासक्रम पाहता येईल. सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाची सविस्तर माहिती वर्गनिहाय वेळापत्रकासह प्रत्येक पालकांपर्यंत पोहचवावी. या निरंतर शिक्षण प्रक्रियेचा लाभ पालकांनी विद्यार्थ्यांना द्यावा, असे आवाहन गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी केले आहे.