Ticker

6/recent/ticker-posts

*दैनिक आजचा लोकप्रश्न च्या नांदेड आवृत्तीचा किनवट मध्ये दणक्यात शुभारंभ.*




*दैनिक आजचा लोकप्रश्न च्या नांदेड आवृत्तीचा किनवट मध्ये दणक्यात शुभारंभ.*

          *अत्यंत अल्पवधीतच लोकप्रिय झालेल्या दैनिक आजचा लोकप्रश्न च्या नांदेड आवृत्तीचे किनवट मध्ये तालुक्यातील मान्यवरांच्या हस्ते अतिशय दणक्यात व उत्साहात वृतमानपत्राचे शुभारंभ व अनावरण करण्यात आले.*
          *दैनिक आजचा लोकप्रश्न चे किनवट तालुका प्रतिनीधी आशिष शेळके यांनी हा शुभारंभ व अनावरण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात त्यांनी किनवट तालुक्यातील प्रतीष्ठीत व्यक्ती, पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक मीडीया प्रतीनीधी व सोबतच सर्वपक्षीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांना आमंत्रित केले होते.*
          *सर्वप्रथम महामानवांच्या प्रतीमेला पुष्पअर्पण व वंदन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उत्तम कानींदे सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उद्दिष्टे सांगुन आशिष शेळके सरांच्या कामाबद्दल माहिती सांगितली. नंतर किनवट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार व वंचित बहुजन आघाडी चे किनवट तालुका अध्यक्ष राजेंद्र शेळके यांच्या हस्ते वृतमानपत्राची रीबीन कापण्यात आली व सर्व मान्यवरांच्या हस्ते वृतमानपत्राचे अनावरण करण्यात आले.*
          *मान्यवरांमध्ये बिजेपी तालुकाध्यक्ष संदिप केंन्द्रे, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, अभय महाजन (नगरसेवक), प्रकाश गब्बा राठोड (माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद नांदेड), शिवा म्यातमवाड (नगरसेवक), शेख सलीम (उपसरपंच), उमेश पिल्लेवार (ग्रामपंचायत सदस्य), ज्येष्ठ पत्रकार अॅड. मिलींद सर्पे (तालुका प्रतिनीधी सकाळ), पत्रकार दत्ता जायभाए (संपादक वंजारी पुकार), इलेक्ट्रॉनिक मीडीया प्रतीनीधी गंगाधर कदम व नासीर तगाले, जाकीर सर (संचालक, व्हिजन अकॅडमी), बालाजी बामणे (युवा कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस), आशिष राठोड (युवा कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस), सामाजिक कार्यकर्ते विजय वाघमारे, महेंद्र नरवाडे, दया पाटील, जयश्री भरणे, रझीया शेख, संतोष गित्ते, विवेक वाघमारे, व राहुल राठोड ईत्यादी उपस्थित होते. सुत्रसंचलन उत्तम कानींदे यांनी केले तर आभार प्रदर्शन आशिष शेळके यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.*