Ticker

6/recent/ticker-posts

*नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी दिव्यांग अँप मध्ये आपली नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायत आँफरेटर किव्वा ग्रामसेवक यांच्या कडुन नोंदणी करून घ्यावी असे आव्हान संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी केले*




*नांदेड  जिल्ह्यातील  दिव्यांग बांधवांनी दिव्यांग अँप मध्ये  आपली नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायत आँफरेटर किव्वा ग्रामसेवक  यांच्या कडुन नोंदणी करून घ्यावी असे आव्हान संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी केले*


नांदेड जिल्हयातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ' दिव्यांग मित्र ' हे अॅप  तयार करण्यात आले असून सदरील अॅप आपल्या  मोबाईलवर प्ले स्टोअर मधून डाऊनलोड ,करून त्यातील माहिती अचूक भरावी असे आवाहन दिव्यांग वृद्ध निराधार मार मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी  केले.
           समाज कल्याण जिल्हा परिषद  विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या दिव्यांगांच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे समाजातील दिव्यांगांपर्यंत पोहचविण्यासाठी गरजू दिव्यांग बांधवांना त्यांचा लाभ  मिळावा  म्हणून *दिव्यांग मित्र नांदेड* हे अॅप    नव्याने  विकसित करण्यात आले असून नांदेड येथे प्रस्तूत अॅपचे ऑनलाईन उद्घाटन राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे .

      सदरील अॅपच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आपली नोंदणी
नऊ फोल्डर सविस्तर  माहिती भरावी जर आपल्या माहिती भरण्यासाठी अडचण आल्यास ग्रामपंचायत आँफरेटर, ग्रामसेवक यांच्याकडे विनामुल्य करावी पैशाची मागणी केल्यास गटविकास अधिकारी  यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करावी
      या आँपमध्ये विविध योजनांची माहिती घेता येणार आहे . तसेच वेळोवेळी मिळणारी  शासकिय  सवलत मदत , सुचना इत्यादींकरीता शासनाकडून  पाठविले जाणारे संदेशही या अॅप व्दारे पाहता येतील .

        या अॅप मध्ये संपूर्ण माहिती भरून घ्यावी. स्वतःचा फोटो ,अपंगत्व प्रमाणपत्र (जिल्हा शल्य चिकित्सक ) आधार कार्ड , वयाचे प्रमाणपत्र, त्यामध्ये समाविष्ट करून त्वरित दा 16 जुलै ते दिनांक ३१ जुलै २०२०पर्यंत भरून द्यावे. असे आदेश  सर्व गटविकास अधिकारी यांना दिले वरिल तारखेस नोंद करून 1आ़ँगस्ँट ते 10 आँगस्ट पर्यंत छाननी करण्याचे  आदेश देऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने दिव्यांची बांधव सवलतीपासुन वंचित राहू नये म्हणून दिव्यांची संघटनेच्या वतीने सोशल मीडियावर फोन करून प्रयत्न करण्यात येत असून  प्रशासनास यांची गंभीर घेतली पाहिजे ,
       नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्याग बांधवांनी जागे होऊन आपणास मिळणाऱ्या सर्व सवलतीसाठी या ॲपद्वारे  सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांनी दिव्यांग मित्र ॲप डाऊनलोड करून नोंदणी ३१जुलै २०२० पर्यंत करावी असेही आवाहन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, ज्ञानेश्वर नवले, राजाभाऊ शेरकुरवार, माधव शिंदे , अनिल करडखेडकर विठ्ठलराव बेलकर, सुदर्शन सोनकांबळे, जाधव ज्ञानेश्वर, यादव फुलारी, पांडुरोग सुर्यवंशी,सलिम दौलताबादी, हंनमत हेळगिर, राहूल सोनुले,  रामलु मोगरेवार, राजेंद्र शेळके
यांनी केले आहे.