Ticker

6/recent/ticker-posts

*बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानीच्या दणक्याने दोन बियाणे कंपन्यावर गुन्हे दाखल.* *प्रशासन कारवाई करीत नी नसल्यामुळे प्रशांत डिक्कर यांनी कृषी विभागात मांडला होता ठीय्या.*





*बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानीच्या दणक्याने दोन बियाणे कंपन्यावर गुन्हे दाखल.*
*प्रशासन कारवाई करीत नसल्यामुळे प्रशांत डिक्कर यांनी कृषी विभागात मांडला होता ठीय्या.*
 संग्रामपुर : बोगस सोयाबिन बियाणे विकुण शेतक-यांची फसवणुक केल्या प्रकरणी संग्रामपुर पोलिस स्टेशनमधे दोन कंपन्यानवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संग्रामपुर तालुक्यात बियाणे कंपनिने बोगस बियाणे विकल्याच्या तक्रारी शेतक-यानकडुन कृषी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. पंरतु कारवाई होत नसल्याने १६ जुलै रोजी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी रात्री ८ वाजे पर्यंत कृषी कार्यालयात ठाण मांडुन बसल्याने अखेर रात्री ११:३० वाजता दोन कंपन्यानवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी डिक्कर यांनी कृषी विभागा मार्फत कंपनीकडे केली होती. पंरतु कंपन्या भरपाई देत नसल्याने अखेर वरदान व रवी सीड्स अशा दोन सोयाबिन बियाणे कंपन्यावर शेतक-यांची फसवणुक केल्या प्रकरणी अन्य कलमा नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तक्रारी करुनहि शेतक-यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने  स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांच्याकडुन आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला होता. त्यामुळे कृषी विभागा मार्फत संग्रामपुर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्याने १६ जुलै रात्री ११:३० वाजता रवी व वरदान दोन सीड्स कंपन्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.