Ticker

6/recent/ticker-posts

*जवाहेरुल-उलूम-उर्दू विद्यालयाची यशाची परंपरा कायम*




*जवाहेरुल-उलूम-उर्दू विद्यालयाची यशाची परंपरा कायम*

किनवट :-( नसीर त गा ले)     तालुक्यातील एकमे उर्दू विद्यालय जवाहेरुल-उलूम-उर्दू विद्यालय चा निकाल दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चांगला लागला. कला शाखेचा निकाल 96% टक्के  लागला असून या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हाजी ईसा खान यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
        किनवट तालुक्यातील एकमेव उर्दू विद्यालयचा कला शाखेचा निकाल यावर्षी चांगला लागला असून शाखेमध्ये एकूण 46 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 44 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या विद्यालयात *तरन्नुम बेगम शेख शरफोद्दीन* 84% या विद्यालयात पहली ठरली तर *मुस्कान बेगम फ़ारूक़ खादरी* याने 80% टक्के, *बुशरा बेगम फ़ारूक़ खादरी* 80% या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले. संस्थेचे अध्यक्ष *हाजी ईसा खान,* मुख्याध्यापीका *आसमा खातून* व सर्व शिक्षकवृंद यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले..