Ticker

6/recent/ticker-posts

किनवट/माहूर प्रतिनिधी : कोठारी ( सिंद) व रामजी नाईक तांडा या गावातील विदुयत रोहित्र जळल्याने दोन वर्षे पासुन विजेची समस्या निर्माण झाली होती. हि बाब खासदार हेमंत पाटील यांच्या कानावर पडताच अधिक्षक अभियंता नां




किनवट/माहूर प्रतिनिधी : नसीर त गा ले
कोठारी ( सिंद) व रामजी नाईक तांडा या गावातील विदुयत रोहित्र जळल्याने दोन वर्षे पासुन  विजेची समस्या निर्माण झाली होती. हि बाब खासदार हेमंत पाटील यांच्या कानावर पडताच अधिक्षक अभियंता नांदेड या पत्र देऊन तात्काळ डीपी उपलब्ध करून देण्याचे सुचना देताच दोन्ही गावात सिगल फेस डिपी मिळाल्याने गावकरयांतुन समाधान व्यक्त केले जात आहे .
    मांडवी उपकेंद्रा अंतर्गत येणारया कोठारी (सिंद) व रामजी नाईक तांडा येथे दोन वर्षापुर्वी सिंगल फेस विदुयत रोहित्र जळाले होते. याबाबत संबंधित महवितरण कंपनीच्या अधिकारयांना वारंवारं निवेदने देवून सुद्धा रोहित्र मिळत नव्हते.  कोठारी गावाचे दोन सर्किट वरील सहा रोहित्र पैकी पाच रोहित्र जळाले असल्याने एका रोहित्रावरून विज पुरवठा केला जात होता. त्यामुळं कमी दाबाने विज पुरवठा व वारं वारं विज पुरवठा खंडित होत असे. तर रामजी नाईक तांडा येथील तिनही विदुयत रोहित्र जळाल्याने तेथे थ्री फेस रोहित्रावरून विज पुरवठा होत होता. त्यामुळे थ्री फेस असेल तरच गावात विज राहत असे अन्यथा विज मिळत नव्हती.  याबाबत दोन्ही गावाचा नागरिकांनी महवितरण अधिकारयांना तक्रार देऊन सुद्धा रोहित्र दिल्या जात नव्हते
    या गंभीर समस्या ची तक्रार खासदार हेमंत पाटील यांच्या कडे गावातील सरपंच प्राजक्ता अशोक मेश्राम, उपसरपंच आम्रपाली वैशपाल कांबळे, दामोदर तोडसाम, वकिल राठोड, राम वाडगुरे, गंगाधर भंडरवार, सुरेश राठोड, आदि गावकरयांनी केली होती. याची तात्काळ दखल घेऊन खासदार हेमंत पाटील यांनी अधिक्षक अभियंता नांदेड यांना पत्र देऊन तात्काळ रोहित्र उपलब्ध करून देण्याचे सुचना देताच दोन्ही गावात सिंगल फेसचे सहा विदुयत रोहित्र मिळाल्याने गावकरयांतुन समाधान व्यक्त केल्या जात आहे.