Ticker

6/recent/ticker-posts

*मा.पंकजाताई साहेबांनी #जलयुक्त_शिवार अंतर्गत केलेली #जलक्रांती #महाराष्ट्रासाठी_वरदान!*





*मा.पंकजाताई साहेबांनी #जलयुक्त_शिवार अंतर्गत केलेली #जलक्रांती #महाराष्ट्रासाठी_वरदान!*

माझ्या डोंगरी आणि आदिवासी मागास असलेल्या #किनवट_तालुक्यातील अंबाडी तांडा गावा नजीकच्या नाल्यावर आदरणीय #पंकजाताईसाहेबांच्या #जलयुक्त_शिवार योजने अंतर्गत अंतर्गत झालेलं अप्रतिम कामं!

*नाला खोलीकरण, रुंदीकरण  आणि सिमेंट नाला बंधारा!*

या जलयुक्त शिवार च्या कामामुळे पावसाच्या पहील्याच पंधरवाड्यात नाला तुडुंब भरला!
त्यामुळे न राहूनही भर पावसात गाडी थांबवून फोटो आणि सेल्फि घेण्याचा मोह आवरला नाही!

*एरव्ही या नाल्यास बादलीभरही पाणी साचून/थांबून राहत नव्हते, साधे बैल पोळा सणास बैलांना अंघोळ घालण्याएवढेही पाणी त्या नाल्यास साचून/थांबून राहत नव्हते त्यामुळे शेतकर्यांना पोळ्याच्या दिवशी बैलांना अंघोळ घालण्यासाठी घरी आणाव लागत होतं! तर आज त्याच नाल्याला लाखो लिटर पाणी थांबून आहे, जमीनीत मुरत आहे! शेजारी गाव असलेल्या अंबाडी तांडा येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहीरीच्या पाण्याची पातळी पण लक्षणीय वाढली आहे! आसपास राखीव वन क्षेत्र असलेल्या जंगलातील मुक्या वन्य प्राण्यांनाही पिण्यासाठी हक्काचे पाणी उपलब्ध झाले आहे! हा फक्त पंकजाताई साहेबांच्या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अथक मेहनतीने केलेल्या अप्रतिम जलक्रांतीचाच चमत्कार आहे!*

*पाणी अडवा पाणी जिरवा* ही शासकीय संकल्पना आतापर्यंत कागदावर आणि शाळेच्या भिंतीपूरतीच मर्यादित राहिली होती, मात्र पंकजाताई साहेबांनी जलयुक्त शिवार अभियाना सारख्या अभिनव योजनेतून त्या संकल्पनेस बनवून गाव वाडी वस्ती तांडे पाडे पर्यंत पोहचवून एक जन आंदोलन बनवलं!
आणि त्यातून राज्य भरात झालेल्या अशा पाणी अडविण्याच्या अप्रतिम हजारो कामांमुळे मराठवाड्या सारख्या टैंकरप्रवण भागातही पाण्याची टंचाई अभूतपूर्व कमी होण्यास मदत झाली!

पंकजाताई साहेबांची कारकिर्द ही नक्किच अभूतपूर्वच होती आणि भविष्यातही विकासापासून न्याय हक्कांपासून रखडलेला ग्रामीण भाग आणि पीडीत, शोषीत, वंचीत, शेतकरी,मजुर कष्टकरी अशा जनसामान्य लोकं पंकजाताई साहेबांमध्ये संघर्षयौध्दा आधारवड लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे प्रतिबिंबच पाहत आहेत!

*महाराष्ट्रातील प्रत्येक जनसामान्यांच्या मनात आता एकच आस आहे कि पंकजाताई साहेबांनी परत एकदा जलयुक्त शिवार सारखी विकास क्रांती महाराष्ट्रात करून सर्व दिन, दुबळ्या, पीडीत, वंचीत, उपेक्षित, शेतकरी, कष्टकरी, मजुर अशा जनसामान्यांचे अश्रू पुसावेत!*

*पण आजकाल विकास क्रांती करणार्या कर्तूत्ववान आणि  स्वाभिमानी लोकांची कुठे कदर होते!*
 *सर्वांना ताटाखालची मांजरे आणि आणि आपल्या इशार्यावर माना डोलवीणारे नंदि बैलच आसपास हवे आहेत!*

मात्र ईश्वर कृपेने पंकजाताई साहेबांना परत एकदा महाराष्ट्रात सर्वांना सोबत घेऊन जनसामान्यांचे कल्याण करण्याची संधी प्राप्त व्हावी अशी महाराष्ट्रातील प्रत्येक पीडीत वंचीत उपेक्षित विकासापासून दूर राहिलेल्या जनतेच्या मनात भावना आहेत!

आपल्या स्वकर्तूत्वाने जलयुक्त शिवार सारखी अभूतपूर्व अभिनव योजना महाराष्ट्रभर उत्कृष्टरित्या राबवून महाराष्ट्रात जलक्रांती केल्याबदल पंकजाताई साहेबांचे हार्दिक अभिनंदन!
आणि या यशस्वी जलक्रांती करीता एक जनसामान्य महाराष्ट्रीयन म्हणून पंकजाताई साहेबांचे ह्रदयापासून मनस्वी आभार!

*- रामकिशन कागणे*
ता. किनवट जिल्हा नांदेड
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏