Ticker

6/recent/ticker-posts

पब्जी की वजेसे एक लडके की जान गई किनवट बाईघटना





माहूर तालुक्यातील मौजे मछींद्र पार्डी येथील तरूण राजेश नंदू राठोड (वय १८ वर्षे) हा तरूण आज (दि. २५ जुलै) आपल्या घराशेजारीच मोबाईलवर पबजी ही मोबाईल गेम खेळत बसला होता. त्यावेळी वडील व घरातील इतर मंडळी आपापल्या दैनंदिन कामात व्यस्त असल्याने राजेशकडे कुणाचे लक्ष नव्हते. राजेश हा गेम खेळताना अचानक कधी गतप्राण झाला हे कुणाच्याही लक्षात आले नाही. दरम्यान, राजेश हा कोणत्याही प्रकारची हालचाल करीत नसल्याचे त्याच्या वडिलांच्या लक्षात आल्यानंतर झालेल्या आरडाओरड्याने संपुर्ण गाव गोळा झाले होते. गेम खेळताना डिप्रेशनमध्ये गेल्याने हृदयविकाराचा धक्का आला असावा त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता ग्रामस्थांकडून वर्तविण्यात आली आहे.

 "राजेश हा तरूण पबजीच्या एवढ्या आहारी गेला होता की, येथे मोबाईल नेटवर्क कमजोर असल्याने पुरेसे नेटवर्क मिळविण्यासाठी राजेश हा कधी कधी झाडावर बसून देखील पबजी गेम खेळताना त्याला अनेकांनी पाहिले असल्याचे चर्चा चालू होती.  

तर मयत राजेशची अवस्था पाहता ऐन 'नागपंचमी'च्या दिवशी घडलेल्या या अनपेक्षीत घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, शोकाकूल वातावरणात राजेशच्या पार्थिवावर म. पार्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. घातक ऑनलाईन गेम्सवर शासनाने तातडीने बंदी घालावी अशी मागणी होत आहे.