Ticker

6/recent/ticker-posts

देवधर पंकजा मुंडे प्रीतम मुंडे इनके हाथों से काम किया गया




*बायपास सह गंगाखेड , धर्मापुरी रस्त्याची कामे पंकजाताई प्रितमत्ताई मुळेच मार्गी ?*
       *विरोधकांचा श्रेयासाठी केविलवाणा प्रयत्न ,*
    *भाजपा तालुकाध्यक्ष सतिश मुंडे*
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ..,,, .,,,,,,,,
परळी दि (नसीर त गा ले )
परळी बायपास रस्त्याचा प्रश्न माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या या कार्यकाळातच मार्गी लागलेला असून आर्थिक तरतूद सुद्धा करण्यात आली होती तर दुसऱ्या बाजूने गंगाखेड आणि धर्मापुरी राष्ट्रीय महामार्गाची कामे वार्षिक आराखड्यात मंजूर करून घेतली त्याचा संपूर्ण से खासदार डॉक्टर प्रीतम ताई गोपीनाथ मुंडे यांना आहे हे मात्र हे सर्व आपणच केलं म्हणून प्रसार माध्यमाद्वारे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक करत असल्याची टीका भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी  केली आहे
                यासंदर्भात प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात सतीश मुंडे यांनी म्हटले आहे की  अनेक वर्षापासून परळी शहराचा बायपास रस्ता प्रलंबित पडलेला होता मात्र पंकजाताई पालकमंत्री असताना विशेष भाग म्हणून चार किलोमीटर हा रस्ता मंजूर करून साठ कोटी रुपये त्यासाठी मंजूर करूनही घेतले होते त्यांच्याच कारकिर्दीमध्ये  या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला दुसऱ्या बाजूने परळी ते गंगाखेड आणि परळी ते धर्मापुरी या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्ग मध्ये समावेश करून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा आमच्या खासदार प्रीतम ताई गोपीनाथ मुंडे यांनी केलेला होता त्यामुळे वार्षिक आराखड्यामध्ये या रस्त्याचा समावेश होऊन सदरील कामे मंजूर झाली होती या सर्व कामाचं श्रेय मुंडे भगिनी ला असून विरोधक मात्र आम्ही केलेली कामे प्रसार माध्यमाद्वारे आपण केली असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीका भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी केली आहे.