Ticker

6/recent/ticker-posts

अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना करण्यात यावी आ.भीमराव केराम यांची पत्राद्वारे मा.मुख्यमंत्र्यांकडे मागणी




अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना करण्यात यावी  आ.भीमराव केराम यांची पत्राद्वारे मा.मुख्यमंत्र्यांकडे मागणी

किनवट: ( ता.प्रतिनिधी राजेश पाटील आज की न्यूज चॅनल)
महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना करण्यात यावी
अशी मागणी पत्राद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या कडे किनवट माहूर चे आमदार भीमराव केराम यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाच्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक विकास झालेला नाही. आजही मातंग समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून बऱ्याच प्रमाणात वंचित आहेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी समाजाची शैक्षणिक उन्नती होणे आवश्यक आहे.  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था( बार्टी) या प्रमाणेच स्वतंत्र साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना करण्यात यावी अशी महाराष्ट्रातील तमाम समाजातील सामाजिक संघटना व मातंग समाजाची मागणी आहे. आर्टी स्थापना झाल्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांचा पर्यायाने मातंग समाजाचा सर्वांगीण विकास होईल व व्हिजन महाराष्ट्र 2019 अंतर्गत दिलेल्या वचनाची पूर्ती होईल.
  तरी मातंग समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आर्टी ची स्थापना करण्यात यावी अशी पत्राद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या कडे किनवट माहूर चे आ.भीमराव केराम यांनी केली आहे.