Ticker

6/recent/ticker-posts

प्रीतम ताई मुंडे वेंटिलेटर दिए




*#खा. प्रितमताई मुंडेंच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला पीएम केअर फंडातून ३८ व्हेंटीलेटर*

*जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला मिळाले बळ- आ.नमिताताई मुंदडा*

अंबाजोगाई दि.९--------बीड जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी पंतप्रधान सहाय्यता. निधीतून बीड जिल्ह्याला ३८ व्हेंटीलेटर मिळाले आहेत. बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी व्हेंटीलेटरसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. यानिमित्ताने केज विधानसभा मतदार संघाचा आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खा. प्रीतम मुंडे यांचे आभार मानले आहेत.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे १८७ रूग्ण आढळून आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध रूग्णालयातून ६७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. भविष्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अत्यावस्थ कोरोना प्रभावित रूग्णांना उपचारासाठी व्हेंटीलेटरची नितांत आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन खा. प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयातून मुबलक व्हेंटीलेटर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी पंतप्रधानांकडे केली होती. केंद्र सरकारकडून देशभरातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे खा. मुंडे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत पीएम केअर फंडातून बीड जिल्ह्यासाठी ३८ व्हेंटीलेटर देण्यात आले. त्यापैकी बीड येथील जिल्हा रूग्णालयात १२, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात १७ आणि लोखंडी सावरगाव येथील रूग्णालयात ९ व्हेंटीलेटर देण्यात आले. यामुळे कोरोना प्रभावित अत्यावस्थ रूग्णांवर प्रभावी उपचार करणे शक्य होणार आहे.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला बळकटी : #आ_मुंदडा
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला बळ देण्यासाठी आमच्या नेत्या खा. प्रीतमताई मुंडे प्रयत्नशील आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याला पंतप्रधान सहाय्यता निधीतून ३८ व्हेंटीलेटर मिळाल्याने आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यास मदत झाली आहे असे सांगत आ.नमिताताई मुंदडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खा. प्रीतमताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.