Ticker

6/recent/ticker-posts

*किनवट तालुक्यास दिड दोन डझन गावांना जोडणार्या कोठारी जवळील मुख्य रस्त्यावरच्या जीवघेण्या पुलाचा प्रश्न कधी सुटेल का नाही?* *- रामकिशन कागणे*





*किनवट तालुक्यास दिड दोन डझन गावांना जोडणार्या कोठारी जवळील मुख्य रस्त्यावरच्या जीवघेण्या पुलाचा प्रश्न कधी सुटेल का नाही?*
                   *- रामकिशन कागणे*

*किनवट तालुक्यास दिड दोन डझन गावांना जोडणार्या कोठारी जवळील मुख्य रस्त्यावरच्या जीवघेण्या पुलाचा प्रश्न कधी सुटेल का नाही?*
                   *- रामकिशन कागणे*

किनवट तालुक्यास शनिवारपेठ, मदनापूर, दाभाडी, दरसांगवी, टिंगणवाडी, बोधडी खु, पार्डी, येंदा, पेंदा, नागसवाडी, कोपरा, भंडारवाडी,बोधडी अशा दहा पंधरा गावांना जोडणार्या आणि या गावात येणार्या शेतात जाणार्या किनवट गोकूंदा कोठारी प्रधानसांगवी दुधगाव अशा प्रवाशांसाठी एकमेव असलेल्या रस्त्यावरील कोठारी गावानजिकचा पूलाचा प्रश्न हा विस पंचवीस वर्षापासून आहे! तो आज पण जशाच्या तसाच आहे!

पावसाळा आला कि एवढ्या गावातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो! किनवटला भाजीपाला दुध पोहचविणारे शेतकरी, शाळेत जाणारे विद्यार्थी,या गावामध्ये किनवटहुन येणारे सर्व कर्मचारी, प्रवाशी साधा पंधरा वीस मिनिटे पाऊस जरी झाला तरी पुलावरून किमान कमरेईतके पाणी हमखास जातेच आणि रस्ता किमान पाच सहा तासाकरीता बंद!

या कोठारीच्या नाल्यास तेलंगणा तून खूप दूरून पाणी येत अनेक छोटे मोठे नाले त्यात येऊन मिसळतात त्यामुळे वरच्या भागात दूर जरी पाऊस झाला तरी आमचा रस्ता बंद झालाच समजा!

*पावसाळ्यात या पुलावरून जाणे आणि मौत का कुआ मध्ये गाडी चालविणे सारखेच!या पंचवीस वर्षात पुलावरून पावसाळ्यात जातांना पाण्यात वाहून जावून आतापर्यंत अनेक लोकांचे, शेतकर्यांचे,गुरा ढोरांचे कित्येक बळी गेले गाड्या अॅटो टेम्पो ट्रॅक्टर सारखी कित्येक वाहने वाहून गेले! या पुलाचे रखडलेले काम पूर्ण व्हावं यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने, शासन प्रशासन लोकप्रतिनिधी कडे निवेदने,तक्रारी, रास्तारोको झाले. अनेक सन्माननीय पत्रकार बांधवांनीही हा प्रश्न दैनिकात अनेकदा मांडला आहे!*
*मात्र शासन आणि प्रशासनास अजुन तरी घाम फुटलेला कधीच जाणवला नाही!*

दोन तीन वर्षापूर्वी कोठारीचा शेतकरी या पुलात बैलजोडी सहीत वाहून गेला आणि त्यात दुर्दैवी बैलासह तो मरणही पावला असे कित्येक अपघात यावर झाले पण या रखडलेल्या पुलाचा पाठपुरावा करून कोणीच प्रश्न मार्गी लावला नाही! यापूर्वी जवळपास पंचवीस वर्षापूर्वी या पुलाचे नविन बांधकाम सुरू झाले होते दोन्ही साईडची मुख्य पिलर भिंती पण उभारल्या गेल्या नंतर काय असे घडले कि ते काम आज पंचविस वर्षांपासून तसेच रखडून आहे. कोणी मणत खाली पक्का मुरूम नाही कोणी मणत गाळच आहे म्हणून काम थांबल अरे येडपटानों लोकं समुद्रात पूल उभारत आहेत तर हे त्यापेक्षा अवघड होते का?

मागे दोन वर्षापूर्वी नविन काम मंजुर झालं आता चांगला  पूल होणार म्हणून अनेक बातम्या पेरल्या गेल्या मात्र अजुन तरी त्या पुलावर नविन कामाचे एक कुदळ पण मारली गेली नाही. अजुन त्या पुलावर किती गुरे ढोरे माणसांचे जीव गेल्यानंतर शासन प्रशासनास जाग येईल ते देवच जाणे!

*या पुलाच्या प्रश्नाकरीता चार पाच वर्षापासून आम्ही सोशल मीडीया वर वाचा फोडत आहोत, माझ्यासह आमच्या शेख शाकिर भाई, विनोद पवार भाऊ , उदल जाधव भाऊ, अतुल दर्शनवाड भाऊ अशा अनेक मित्र मंडळींनी शासन प्रशासनास निवेदने दिले आंदोलने केली सोशल मीडीया वर सतत या प्रश्नावर मांडणीही केली मात्र अद्यापही त्या पुलाचे काम साधे सुरू पण झाले नाही उलट आहे तो पूल दरवर्षी खचून जावून दिवसेंदिवस धोकादायकच होत आहे!*

वर फोटो मध्ये दर्शविलेले विदारक आणि क्लेषदायक दृश कालचे आहे! पुलाच्या दोन्ही कडेला असहाय बनून शे-दोनशे थांबलेली माणसे गुरे ढोरे,लहान मुले, महीला भगिनीं दोन तीन तास असहाय होऊन थांबून होते! सायंकाळी सहा साडे सहा नंतर पाणी थोडे कमी झाले होते तरीही मांड्याईतके पाणी होतेच मग एक एका मोटरसायकल ला चार पाच माणसे धरून उचलून काढत होती,महीला भगिनींची व लहान मुलांची पाण्यातून येतांना भितीने होणारे रड ओरड ती आणि गाड्या ओढून उचलून काढणारी पाच पाच माणसे हा त्रास पावसाळाभर नित्याचेच झाले आहे!
मी सुध्दा काल पाण्यात अडकलो होतो गावातील मित्रमंडळ आणि जमलेली मंडळी मिळून मोटरसायकल बाहेर काढली इतरांनाही काढू लागलो!

हा प्रश्न विद्यमान आमदार महोदयांनी विधीमंडळात ही मांडला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारीही आहोत मात्र  अद्यापही त्या पुलाचे काम सुरू पण झालेले नाही!
मागच्या वर्षी शिवसेना तालुका प्रमुख मा बालाजी मुरकुटे पाटील आणि तत्कालीन पंचायत समिती उप सभापती मा.गजानन कोल्हे पाटील यांनी स्वतः जेशीबी आणून त्या पुलात अडकलेला कचरा पुरसण काढून रस्ता मोकळा करून दिला त्यामुळे नंतर काही दिवस त्यामुळे हा त्रास मागच्या वर्षी जाणवला नाही!
मात्र या पुलाचे परमनंट पक्के काम होणे महत्वाचे आहे!

*आज जग चंद्रावर जावून मंगळावर जात असतांना हा आमच्या पंधरा वीस गावच्या हजारो नागरीकांच्या नसिबाला शासन प्रशासनाच्या नाकर्तेपणा मुळे आलेला कृत्रीम भोग कधी संपेल ईश्वरच जाणे!*

परमेश्वर शासन प्रशासनास आणि सर्व लोकप्रतिनिधींना याबाबत सद्बुध्दी देवून हा जीवघेण्या धोकादायक पुलाचा प्रश्न लवकर मार्गी लावो ही ईश्वर चरणी प्रार्थना!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
     *- रामकिशन कागणे*
मदनापूर ता. किनवट जिल्हा नांदेड