Ticker

6/recent/ticker-posts

#हिंगोली_जिल्ह्या_होणार_हळदीचे_क्लस्टर आज रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा.ना.श्री. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात माझ्या मतदार संघातील हिंगोली जिल्ह्यात हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळ स्थापने संदर्भात बैठक घेण्यात आली




#हिंगोली_जिल्ह्या_होणार_हळदीचे_क्लस्टर

आज रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा.ना.श्री. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात माझ्या मतदार संघातील हिंगोली जिल्ह्यात हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळ स्थापने संदर्भात बैठक घेण्यात आली.
 या बैठकीसाठी कृषी सचिव श्री एकनाथ डवले, कृषी आयुक्त पुणे श्री धीरजकुमार, संचालक फलोत्पादन केंद्रीय स्पाइस बोर्डाचे उपसंचालक श्री बी.एन. झा, सचिव श्री अशोक आत्राम, पणन विभागाचे संचालक श्री सतीश सोनी, हिंगोली जिल्हा कृषी अधिक्षक विजय लोखंडे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
 या बैठकीमध्ये हळद संदर्भात हळद संशोधन बोर्डाच्या स्थापने संदर्भात प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रस्ताव लवकरच वित्त व विधी विभागाच्या मान्यतेने मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15 ऑगस्ट पर्यंत ठेवण्यात येणार आहे.
         या बैठकीत हळद लागवड, काढणी खर्च, बॉयलिंग प्रक्रिया, मार्केटिंग, ब्रँडिंग व निर्यात या संदर्भात चर्चा करण्यात आली.  हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर भागात मोठ्या प्रमाणात हळदीचा कोच्याचा व्यापार होत असून त्यासाठी या भागात विशेष क्लस्टर निर्माण करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या भागात मोठ्या प्रमाणात पारंपरिक शेती केली जाते यावर संशोधन होणे गरजेचे आहे.त्याचबरोबर लागवडीसाठी निर्दोष टिश्यू कल्चरचे बेणे तयार करण्यासाठी या महामंडळांतर्गत अद्ययावत प्रयोगशाळा तयार करण्यात येणार आहे. यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार असून या महामंडळाचे प्रारूप ठरवणार आहे. या समितीचे अध्यक्ष कृषिमंत्री,  तर कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक, महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक वसाहत प्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपनी, प्रक्रिया उद्योगातील प्रतिनिधी, प्रगतीतील शेतकरी, हळद निर्यातदार तसेच केंद्रीय स्थायी बोर्डाचे उपसंचालक व केंद्रीय वाणिज्य समितीचे सदस्य यांचा समावेश राहणार आहे.