Ticker

6/recent/ticker-posts

बिजली गिरने से मौत आर्थिक मदद




वीज पडून मयतच्या वारसास आमदार भीमराव केराम यांचे हस्ते तहसिलदार उत्तम कागणे यांनी दिला चार लाखाचा धनादेश

किनवट ( नसीर त गा ले): तालुक्यातील मांडवा येथील वीज पडून मृत्यू पावलेल्या तरुणाच्या वारसास आमदारांचे हस्ते सानुग्रह अनुदान वाटपाची प्रक्रिया आठ दिवसात पूर्ण करून तहसिलदारांनी मयत परिवाराचे कृतीशील सांत्वन केले आहे.
               येथून नऊ किलोमीटर अंतरावरील मांडवा शिवारात दि. २ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता सुरेश जंगु कनाके ( वय २२ ) या आदिवासी युवा शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला होता. त्याचे वारस पिता जंगू नागोराव कनाके यांना त्यांच्या घरी जाऊन शुक्रवारी (दि.१० ) आमदार भीमराव केराम यांचे हस्ते शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाचा चार लाख रुपयाचा धनादेश तहसिलदार उत्तम कागणे यांनी प्रदान केला. यावेळी सरपंच कनाके, उपसरपंच इरपणवार, गोवर्धन मुंडे, अनिरुद्र केंद्रे, आत्माराम मुंडे, मारोती भरकड, संतोष मऱ्हसकोल्हे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 
               जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार उत्तम कागणे यांनी नैसर्गिक आपत्तीच्या या घटनेनंतर अवघ्या आठ दिवसात ही कार्यवाही पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त केल्या जात आहे.