Ticker

6/recent/ticker-posts

माजी बाल कल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त बोधडी (खुर्द )येथे वृक्षारोपण



माजी बाल कल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त बोधडी (खुर्द )येथे वृक्षारोपण


किनवट ( तालुका प्रतिनिधी आज की न्यूज चॅनल) : माजी बाल कल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त बोधडी (खुर्द) येथे वृक्षारोपण करण्यात आले. आमदार भीमराव केराम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते ; तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार उत्तम कागणे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, ज्येष्ठ नागरिकसंघाचे डॉ. नामदेव कराड, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष गोविंद अंकुरवाड, भाजपा नेते ऍड. रमण जायभाये, भाजप तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, गोवर्धन मुंडे, अनिरूद्र केंद्रे, पं.स.सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, उपसभापती कपिल करेवाड, भाजपा शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, नगरसेवक नरेश शिरमनवार, शिवा आंधळे, सागर पिसारीवार, उपसरपंच विष्णू दराडे, प्रा. गोवर्धन लांब, बालाजी केंद्रे, आमदारांचे जनसंपर्क अधिकारी संतोष मरस्कोल्हे आदिंची उपस्थिती होती.
                ओ.बी.सी.जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. रघुनाथ कराड यांनी सूत्रसंचालन केले.
                कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी गिते, गोविंद गीते, बंडू कुभार, गुलाब कटारे, समाधान महाराज, लहू मुंडे, श्रीनिवास फड आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी -कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होतें.