आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी व दाट लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्तीने आणि सामुहिक प्रयत्नांतून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले आणि कोरोना विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर नाव नोंदवलं या शब्दात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
धारावीमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२% वर गेले असून आज ॲक्टीव्ह केसेसची संख्या फक्त १६६ आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस अडहॅनम गेब्रेयेसुस यांनी ज्या देशांनी कोरोना नियंत्रणात उत्तम कामगिरी केली त्यांची उदहारणे देतांना धारावीतील एकात्मिक प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख केला.
-
जागतिक महामारीच्या परिस्थितीत अशी उदाहरणे साथीच्या प्रादुर्भावातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात या शब्दात मुख्यमंत्र्यांनी कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतूक केले. धारावीच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर घेतलेली नोंद ही कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ देणारी आहे.
-
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतूक करतांना कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी दिली आहे. हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.