किनवटमध्ये आज 13 बाधितांची भर
किनवट ( तालुका प्रतिनिधी) : किनवटमध्ये शनिवारी (दि. 22) सायंकाळी 06.50 वाजता प्राप्त माहिती नुसार आरटीपीसीआर टेस्ट द्वारे 4 व रॅपिड एँटिजेन टेस्ट द्वारे 9 असे एकूण 13 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 104 झाली आहे. आजपर्यंत एकूण 66 व्यक्तींना सुटी दिली आहे. बाधितांपैकी येथील कोविड केअर सेंटरमध्ये 19 रुग्ण उपचार घेत आहेत. 2 रुग्ण संदर्भिय सेवेसाठी इतरत्र दाखल आहेत.
आज आलेल्या तपासणी अहवालात किनवटच्या एस.व्ही.एम. कॉलनी येथील 43 वर्षाच्या 1 महिलेचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील 28 वर्षाची 1महिला, 21 वर्षाची 1महिला व 37 वर्षाच्या एक पुरुष , वेलमापूरा येथील 35 व 52 वर्षाचे 2 पुरुष, राजेंद्रनगर येथील 41 व 25 वर्षाचे 2 पुरुष व 13 वर्षाचा 1 मुलगा, साईनगर येथील 8 वर्षाची 1 मुलगी, 30 वर्षाची 1 महिला व 18 वर्षाचा 1 तरुणाचा आणि पार्डी (किनवट ) येथील 42 वर्षाचा 1 पुरुष अशा एकूण 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे.
त्यामुळे उप विभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी पार्डी व किनवट शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व साईनगर या भागाला कंटेन्मेंट झोन जाहिर केले आहे. या सर्व कंटेनमेंट झोनच्या विविध कामांची जबाबदारी तहसिलदार उत्तम कागणे यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरिक्षक मारोती थोरात, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांचेवर सोपविलेली आहे. हे अधिकारी नेटाने ती पार पाडत आहेत.
डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 8, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 11अशा एकूण 19 व 2 संदर्भित रुग्ण सेवेसाठी इतरत्र दाखल केले आहेत. अशा एकूण 21 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.
किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
दि. 22/08/2020 सायंकाळी 06.50 वाजता
आरटीपीसीआर टेस्ट
घेतलेले एकूण स्वॅब- 326,
निगेटिव्ह स्वॅब- 181,
आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह संख्या- 4
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 2
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,
ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट -56
निगेटिव्ह अहवाल - 47
आज रोजी पॉझिटीव्ह अहवाल - 9
आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण -13
आज मृत्यू - 0
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-6,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती- 104,
आज सुटी दिलेले -0
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-66,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-21
संपादक आज की न्यूज़ किनवत नसीर तगाले
मोबाइल नंबर 9822651763