Ticker

6/recent/ticker-posts

मा. जिल्हाधिकारी,नांदेड यांचे प्रतिबंधात्मक आदेशानुसार करोना महामारी संबधी सी.आर.पी.सी. चे 144 कलम लागू केले आहे. त्या अन्वये पोळा सण सुद्धा एकत्रित येऊन सार्वजनिकरित्‍या साजरा करण्यावर बंदी आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस पाटील यांनी गावात


मा. जिल्हाधिकारी,नांदेड  यांचे प्रतिबंधात्मक आदेशानुसार करोना महामारी संबधी सी.आर.पी.सी. चे 144 कलम लागू केले आहे. त्या अन्वये  पोळा सण सुद्धा एकत्रित येऊन सार्वजनिकरित्‍या साजरा करण्यावर बंदी आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस पाटील यांनी गावात सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रा.पंं. सदस्य व पोळ्याचे मानकरी यांची गावात छोटेखानी 5 लोकांचे उपस्थित मिटिंग घेऊन वरील आदेशानुसार सार्वजनिक कार्यक्रम घेण्यावर बंदी असल्याने तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध फौजदारी कारवाईची तरतूद असल्याने आपल्या गावात पोळा सण फक्त घरचे घरीच साजरा करण्याबाबत व बैलांना सार्वजनिक ठिकाणी किंवा मंदिरावर एकत्र नेता येत नाही, गावातील नागरिक एकत्र आले तर एकमेकांना संसर्ग होऊन कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याने गावकऱ्यांचे हिता करिता व गावकऱ्यांचे आरोग्याचे दृष्टीने सार्वजनिक पोळा भरविणे चांगले नाही म्हणून घरीच बैलाची पूजा करून घरीच सण साजरा करण्याबाबत त्यांना माहिती द्यावी. तसेच सगळ्या बाबी लक्षात आणून देऊन घरचे घरीच बैलाचे पूजन करण्याचे ठरवून तशी गावात दवंडीद्वारे प्रसिद्धी द्यावी, तसेच कोरोना रॅपिड टेस्ट करणे आरोग्याचे दृष्टीने आवश्यक असल्याचे महत्व सांगून गावातील 50 वर्षा वरील वयोगटातील नागरिक, मधुमेह , बीपी, हृदय विकार, दमा, ताप, सर्दी, खोकला ,तसेच गावातील गरोदर माता व ग्रामसमिती सर्व सदस्यांची तहसीलदार यांचे सूचनेनुसार रॅपिड चाचणी करिता यादी तयार करून तलाठी किंवा तहसीलदार यांचेकडे द्यावी, गावात सौजन्याचे वातावरण ठेवण्यासाठी सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रा प सदस्य यांना मान देऊन ,मोठेपणा देऊन हा निर्णय घेऊन मिटिंग मधील सूचनांचे पालन करावे व कोणत्याही गावात पोळा भरणार नाही याची दक्षता घ्यावी ,याबाबत गावात काही मतमतांतरे किंवा अडचणी ,समस्या असतील तर तहसीलदार व ठाणेदार यांना कळवाव्यात .सर्व  पोलीस पाटील मंडळींनी वरील सर्व बाबीबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी.
- उत्तम कागणे
तहसिलदार किनवट Aaj Ki News kinwat ko dekhne ke liye is link par jaao