Ticker

6/recent/ticker-posts

किनवटमध्ये आज 2 बाधितांची भर


किनवटमध्ये आज  2 बाधितांची भर

किनवट ( तालुका प्रतिनिधी) : किनवटमध्ये शुक्रवारी (दि. 21) सायंकाळी 6 वाजता प्राप्त माहिती नुसार रॅपिड एँटिजेन टेस्ट द्वारे 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 91 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 66 व्यक्तींना सुटी दिली आहे. बाधितांपैकी येथील कोविड केअर सेंटरमध्ये 13 रुग्ण उपचार घेत आहेत.
             आज आलेल्या तपासणी अहवालात किनवटच्या एस.व्ही.एम. कॉलनी येथील 78 वर्षाच्या 1 पुरूषाचा व 85 वर्षाच्या 1 महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. 
               
       डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 7, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 6 अशा एकूण 13 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
दि. 21/08/2020  सायंकाळी 6.00 वाजता

आरटीपीसीआर टेस्ट
घेतलेले एकूण स्वॅब- 324,
निगेटिव्ह स्वॅब- 181,
आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह  संख्या- 0
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 4
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7, 

ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट -17
 निगेटिव्ह अहवाल - 15
आज रोजी पॉझिटीव्ह अहवाल - 2

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण - 2
आज मृत्यू - 0
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-6, 
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती-91, 
आज सुटी दिलेले -0
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-66,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-13