मथुरा नगर किनवट येथील रस्ता केव्हा होणार ? 20 वर्षांपासून नगरवासीय रस्त्याच्या प्रतीक्षेत.
किनवट: किनवट नगरपालिका अंतर्गत मथुरानगर येथे गेल्या वीस वर्षापासून येथील नागरिक रस्त्याच्या प्रतीक्षेत असून अनेक निवेदने देऊनही उद्यापर्यंत याकडे येथील मुख्याधिकारी किंवा नगरपालिकेचे पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची तसदी घेतली नाही. मथुरा नगर येथे जाण्यासाठी नगरपालिकेचा एकही रस्ता नाही दुसऱ्याच्या प्लॉटमधून टाकलेल्या तात्पुरत्या रस्त्यांमधून येथील नागरिक ये-जा करीत आहेत. परंतु पावसाळ्याचे चार महिने चिखलाने माखलेल्या रस्त्यातून जाणे-येणे खूपच जिकरीचे होऊन बसले आहे. अनेक वेळेस या नगरातील वृद्ध महिला,पुरुष ,लहान मुले, व बीमार पेशंटला पाठीवरून किंवा खुर्ची ची कावड करून समता नगर पर्यंत घेऊन जावे लागत आहे.
या बाबीची तीव्रता कशी आहे याबाबत येथील नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व नगरसेवक यांना येथील नागरिकांनी अनेक वेळा करून दिली परंतु या covid-19 च्या काळातही येथील नागरिकांना रस्त्याची सुविधा देण्यात नगरपालिका अपयशी ठरली आहे. सध्या पावसाळ्यात नगराध्यक्ष व नगरसेवकांना रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता चालण्यासाठी करून द्यावा असे विनंती नागरिकांना केले परंतु गेल्या आठ दिवसापासून रॉयल्टी मिळत नसल्याच्या च्या नावाखाली या बाबीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे
कोरोना काळातही येथील युवकांनी एकत्र येत सदरील रस्ता थोडाफार दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु नगरपालिकेला काही जाग येत नाही जर आठ दिवसात सदरील रस्ता दुरुस्त न झाल्यास कोरोना काळातही सोशल डिस्टंसिंग ठेवत लोकशाही मार्गाने नगरपालिके समोर उपोषणास बसू असा इशारा येथील युवकांनी दिला आहे.