*जाहीर सूचना*
किनवट व गोकुंदा परिसरातील नागरिकांना याव्दारे सूचित करण्यात येते की, आज संपन्न झालेल्या सर्व पक्षीय व सर्व व्यापाऱ्यांच्या बैठकीत दिनांक 3 सप्टेंबर 2020 गुरुवार ते दिनांक 6 सप्टेंबर 2020 रविवार पर्यंत *जनता कर्फ्यु* पाळण्याचे ठरले आहे.
बैठकीला आ.भीमराव केराम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेम्मानिवार, शिवसेना नेते व्यंकट भांडारवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिनकर , माजी नगराध्यक्ष साजिद खान, सुशील जननावार व डॉ पत्की यांनी विचार व्यक्त केले तर प्रास्ताविक नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, शिवा क्यातमवार यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीनिवास नेम्मानिवार यांनी केले. सदरच्या बैठकीत आ. भीमराव केराम यांच्या आग्रहास्तव नवीन रुजू झालेले सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पूजार, तहसीलदार उत्तम कागणे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक, पोलीस निरीक्षक मारोती थोरात , आरोग्य विभागाचे डॉ धुमाळे उपस्थित होते.