Ticker

6/recent/ticker-posts

शासनमान्य ग्रंथालयांचे 31 कोटी अनुदान वितरीत करण्यास मंजुरीराष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रंथालय विभागाच्या मागणीला यश - जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर



शासनमान्य ग्रंथालयांचे 31 कोटी अनुदान वितरीत करण्यास मंजुरी
राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रंथालय विभागाच्या मागणीला यश - जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर
नांदेड दि. 6 -
राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे सन 2019-20 मधील थकित अनुदान 30 कोटी 93 लाख 75 हजार रूपये वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली असून तसा शासन निर्णय 3 ऑगस्ट रोजी निघाला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर यांना दिली.
सध्या कोरोना विषाणू संक्रमणाने राज्य मोठ्या संकटाला तोंड देत आहे. राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांच्या प्रश्नांसंदर्भात प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष मा.ना. जयंत पाटील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन अर्थमंत्री अजित पवार व उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे ग्रंथालयांच्या थकित अनुदानासंदर्भात मागणी केली होती.
राज्यात 36 जिल्ह्यांपैकी 7 जिल्ह्यांतील सार्वजनिक वाचनालयांना सरकारकडून अनुदान मिळाले नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. लॉकडाऊनच्या अगोदर बिले सादर केलेल्या 39 जिल्ह्यांना अनुदान मिळाले होते. राज्यात अ दर्जाची 334 ग्रंथालये आहेत. ब दर्जाची 2120 व क दर्जाची 4153 तसेच ड दर्जाची 5541 वाचनालये आहेत. वर्षातून दोनवेळा असे त्यांना अनुदान वितरीत केले जाते. यावर्षी दुसरा हप्ता मिळालेला नाही. आता तो प्रश्न निकाली निघाला आहे.
सार्वजनिक ग्रंथालयांच्या थकित अनुदानासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार 30 कोटी 93 लाख 75 हजार रूपये वितरीत करण्यास व खर्च करण्यास शासनाने मंजुरी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रंथालय विभागाच्या समन्वयक सौ. रीताताई बावीस्कर, उपाध्यक्ष प्रशांत लोंढे, अक्रुरमामा सोनटक्के, नांदेड जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर आदी पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.
-------------------------------------------
प्रति,
मा. संपादक/जिल्हा प्रतिनिधी,
दै. -----------------

वरील बातमीस आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रातून प्रसिद्धी द्यावी, ही विनंती.
आपला,

(संतोष दगडगावकर)
मो-8411043333                                            Aaj Ki News Kinwat ko dekhne ke liye is link par jaao