आणखी 6 पॉझिटिव्ह आढळल्याने किनवटमध्ये आज पडली एकूण 11 बाधितांची भर
किनवट ( तालुका प्रतिनिधी) : किनवटमध्ये शनिवारी (दि. 29) सायंकाळी 6.00 वाजता प्राप्त माहिती नुसार रॅपिड एँटिजेन टेस्ट द्वारे आणखी 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजचे एकूण 11 बाधित आलेत. त्यामुळे आता बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 168 झाली आहे. आजपर्यंत 79 व्यक्तींना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सुटी दिली आहे. बाधितांपैकी येथील कोविड केअर सेंटरमध्ये 68 रुग्ण उपचार घेत आहेत. आज 2 रुग्णांना संदर्भिय सेवेसाठी इतरत्र दाखल केले आहे.
आज आलेल्या तपासणी अहवालात किनवटच्या रामनगर येथील 52 वर्षाचा 1 पुरुष, 35 वर्षाचा 1 पुरुष, 36 वर्षाचा 1 पुरुष, 32 वर्षाचा 1 पुरुष,59 वर्षाचा 1 पुरुष,54 वर्षाची 1 महिला,48 वर्षाचा 1 पुरुष,54 वर्षाचा 1 पुरुष,आयप्पा स्वामीनगरातील 29 वर्षाचा 1 पुरुष, एस.व्ही.एम. कॉलनीतील 49 वर्षाचा 1 पुरुष, गोकुंद्याच्या दत्तनगरातील 22 वर्षाचा 1 पुरुष, अशा 11 जणांचा समावेश आहे.
डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 24, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 44 अशा एकूण 68 व आज 2 व पूर्वीचे 6 संदर्भित रुग्ण सेवेसाठी इतरत्र दाखल केले आहेत. अशा एकूण 76 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.
किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
दि. 29/08/2020 सायंकाळी 6.00 वाजता
आरटीपीसीआर टेस्ट
घेतलेले एकूण स्वॅब- 367,
निगेटिव्ह स्वॅब-207,
आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह संख्या- 0,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 08,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,
ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट - 32,
निगेटिव्ह अहवाल -21,
आज रोजी पॉझिटीव्ह अहवाल -11,
आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण -11,
आज मृत्यू - 0
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-7,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -168,
आज सुटी दिलेले-0,
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या- 79,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 68 ( + 8 संदर्भित इतरत्र उपचार घेताहेत )