Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता.प्र दि २४ शहरात कोरोना आजारा सोबतच डेंग्यु सारख्या आजाराने थैमान घातले शहरात अनेक ठीकाणी पावसाचे पडलेले पाणी साचुन रोगराईला निमंत्रण देत आहेत अनेक भागात चिखलाचे साम्राज्य असतांना नगर पालिका प्रशासन या कडे गांभीर्यांने का घेत नाही नागरीकांची कामे वेळेवर होत नाही अनेक समस्या निर्माण असतांना मुख्याधिकारी हे पुर्णवेळ कार्यालत राहात नाहीत या सर्व प्रश्नांना घेऊन जन आंदोलन करु असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे गटनेते नगरसेवक झहीर खान यांनी दिला आहे


किनवट ता.प्र दि २४ शहरात कोरोना आजारा सोबतच डेंग्यु सारख्या आजाराने थैमान घातले शहरात अनेक ठीकाणी पावसाचे पडलेले पाणी साचुन रोगराईला निमंत्रण देत आहेत अनेक भागात चिखलाचे साम्राज्य असतांना नगर पालिका प्रशासन या कडे गांभीर्यांने का घेत नाही नागरीकांची कामे वेळेवर होत नाही अनेक समस्या निर्माण असतांना मुख्याधिकारी हे पुर्णवेळ कार्यालत राहात नाहीत या सर्व प्रश्नांना घेऊन जन आंदोलन करु असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे गटनेते नगरसेवक झहीर खान  यांनी दिला आहे.

       किनवट तालुक्यासह शहरात कोरोना या महाभयंकर आजाराचा वाढता प्रादुर्भाव आज रुग्णाच्या संख्येचे शतक पार केले आहे त्यातच अधिकचा भर म्हणुन डेंग्युचे आजार दिवसेंन दिवस वाढत आहे या सर्व आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर पालिका प्रशासन कुठलेली ठोस पाऊल उचलत नाही किनवट शहरातील मुख्य भाजी मंडी मध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने त्यामुळे रोगराई वाढत आहे. आज गल्ली बोळात अनेक ठीकाणी रस्त्यावर चिखल झाला आहे अनेकांना चिखलातुन रस्ताकाढुन अनेकांना मार्ग काढावा लागत आहे हि बाब नगर पालिका प्रशासनाच्या लक्षात का येत नाही पुर्वी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करुन दिली जात होती परंतु तसे आज होत नाही . नगर पालिकामध्ये आजची सर्वसामान्य नागरीकांचे काम होत नाही त्यात नागरीकांना लागणारा बांधकाम परवाना असो , मालमत्ते चे फेरफार असो हे करुन घेण्यासाठी पालिकेच्या वा-या कराव्या लागतात जाचक अटी व नियम लागु केल्याने सहज होणारे काम वेळ खावु झाले आहे.

       शहरात मोकाट जनावरांचा संचार रस्त्यावरुन चालने अवघड झाले आहे मोकाट गाई , गाढव, कुत्रे, डुकरे यांचा शहरात वाढलेले मुक्त संचार हे नागरीकांकरिता डोकेदुखी झाले आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी नेहमी जिल्ह्याच्या ठीकाणी असतात असा आरोप ही रा.कॉ चे गटनेते झहीर खान यांनी केला आहे या परिस्थितीवर वेळीच दखल घेऊन शहरातील रस्त्यावरचा प्र्शन, रस्त्यावरील पाणी साचण्याचा प्रश्न  जर सोडवण्यात आले नाही तर लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल अशा इशारा राष्ट्रवादी चे गटनेते झहीर खान यांनी दिला आहे. या प्रकरणी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.Aaj ki news kinwat ko dekhne ke liye is link par click here