Ticker

6/recent/ticker-posts

किनवट कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय काम बंद आंदोलनकिनवट



किनवट कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन
किनवट (प्रतिनिधी)
 आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील नगर परिषद कर्मचारी संघटनेने दिनांक १७ ऑगस्ट २०२० रोजी एक दिवसीय संपाची हाक दिल्याने किनवट नगरपरिषद कर्मचारी संघटनेने आज एक दिवसीय संप पाळला. सातवे वेतन वर्ग करावे, हंगामी कामगार कायमस्वरूपी करावे व कोवीड काळात कर्मचाऱ्यांना इतर सेवेचा लाभ द्यावा.अशा विविध मागण्यासाठी यावेळी घोषणा देण्यात आल्या. यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किरण कलगोटूवार ,उपाध्यक्ष चंद्रकांत दुधारे,अल्ताफ अ. गफुर,सचिव सुरेश पुरडवार,सह  प्रकाश गुंटापेल्लीवार ,व्यंकट शिवणकर ,राजू पिल्लेवार, शेख रियाज ,तौफिक खान ,संगीता सिरमलवार व इतर सदस्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.