Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ( प्रतिनिधी )लाकूड तस्करी साठी अति संवेदनशील आणि कुप्रसिध्द समजल्या गेलेल्या चिखली बीट मधील हटकर कोरीच्या जंगलात वनक्षक सिद्धार्थ वैद्य यांच्यावर लाकूड तस्करांनी कुर्‍हाडीने हल्ला करून जंगलातुन पळ काढला

किनवट ( आज की न्यूज़  )लाकूड तस्करी साठी अति संवेदनशील आणि कुप्रसिध्द समजल्या गेलेल्या  चिखली बीट मधील हटकर कोरीच्या जंगलात वनक्षक सिद्धार्थ वैद्य यांच्यावर लाकूड तस्करांनी कुर्‍हाडीने हल्ला करून जंगलातुन पळ काढला . याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे . लाकूड तस्करी विरुद्ध होण्याची ही नोंद करण्यात आली आहे .सदर घटना आज 19 ऑगस्ट सकाळी नऊ वाजता चे दरम्यान घडल्याचे सांगण्यात आले . किनवट वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कार्यकक्षेतील चिखली बुजुर्ग बीटमध्ये 19 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान वनरक्षक सिद्धार्थ मिलिंद वैद्य हे प्रदीप यादव तामगाडगे व लक्ष्मण नागोराव शिंदे या वनमजूरां  सोबत हटकर खोरी च्या जंगलात गस्तीवर होते . लाकूड तस्कर जिवंत सागवान झाडांची तोड करीत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली . त्यांनी तत्काल  तस्करांना झाड तोडण्यापासून  रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या तस्करांनी वनरक्षक वैद्य यांच्या अंगावर कुऱ्हाडीचा वार केला पण तो वार वरक्षक वैद ने आपल्या हातावर घेतल्यामुळे हाताला  दुखापत झाली आहे .कुऱ्हाडीचा वार करून सागवान तस्करांनी झाड कापण्याचा आरा घटनास्थळी फेकून जंगलातून पोबारा केला .तो आरा वनकर्मऱ्यांनी जप्त केला .चिखली बीट हे अति संवेदनशील क्षेत्र संबोधले जाते जवळपास 5 तस्करांचे टोळके असल्याचे समजते तस्करा विरुद्ध किनवट वन विभागा ने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे . त्याच्यानुसार चिखली येथील वन तस्करांवर किनवट पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे . घटनास्थळी वनविभागाचे प्रशिक्षणार्थी उपवनसंरक्षक मधुमिता आणि सहाय्यक वनसंरक्षक विजय गायकवाड यांनी तात्काळ भेट दिली असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत .असे प्राणघातक हल्ले अनेकदा वन कर्मचाऱ्यावर या भागात घडलेले आहेत पण या वनकर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी वन मंत्रालयाने ठोस उपाय योजना आखलेली दिसत नाही . म्हणूनच या जीवघेण्या घटना चा हा परिपाक म्हणावे लागेल . कर्मचाऱ्यांना स्वसंरक्षणासाठी तरी किमान शस्त्र दिल्याशिवाय जंगल सुरक्षित राहणार नाही अश्या प्रतिक्रिया वन प्रेमी नागरिकातून जात आहेत .