Ticker

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्त कर्मचारी भंडारे यांचेकडून गरजू मुलांच्या शिक्षणाकरीता मदतकिनवट = (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील रहिवासी महसूल विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी रमाकांत संभाप्पा भंडारे


सेवानिवृत्त कर्मचारी भंडारे यांचेकडून
 गरजू मुलांच्या शिक्षणाकरीता मदत
किनवट = (तालुका प्रतिनिधी)                     किनवट येथील रहिवासी महसूल विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी रमाकांत संभाप्पा भंडारे हे आपल्या निवृत्त वेतनातून आईवडिलांच्या स्मुर्तीपित्यर्थ दर महिन्याला एका गरीब गरजू व्यक्तींच्या मुलांच्या शिक्षणासाठी अकराशे रुपये मदत करत असतात. या महिन्याच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साठेनगर किनवट येथील श्रीमती गगम्मा नरसिंग (पंजर) माहुरकर यांना सदर मदत देण्यात आली, त्यांना तीन मुले असून वडील नाहीत. कलावती गार्डन किनवट येथे  छोटेखानी कार्यक्रमात पत्रकार मधुकर अन्नेलवार, संतोष अनंतवार, मा. नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, संजय बिराजदार, संपादक दत्ता जायभाये, म.प.परीषदेचे अध्यक्ष अनिल भंडारे, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर मदत देण्यात आली. यावेळी मातंग समाज तालुकाध्यक्ष रविकुमार आयनलवार, लक्ष्मण बोलनवार, गंगाधर मुकणेनीवार, माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, रवी दिसेलवार, कामराज माडपेलीवार, सर्वेश आयनलवार इत्यादींंची उपस्थिती होती.