Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थी जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजनबध्द अभ्यासाची गरज असते - अॅड. सचिन राठोड साहेब




विद्यार्थी जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजनबध्द अभ्यासाची गरज असते - अॅड. सचिन राठोड साहेब

किनवट : दि. १आॅगस्ट२०२० इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, गोकुंदा ता. किनवट येथे लोकमान्य टिळक आणि शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सोबतच १० वी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विमुक्तजन शिक्षण प्रसारक मंडळ, किनवट या संस्थेचे अध्यक्ष अॅड. सचिन राठोड साहेब यांच्या हस्ते शाळेतील विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांचा १००१  ₹  देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी बोलतानां अध्यक्षांनी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले. आणि शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्या बद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी चौकस बुद्धीचा वापर करून आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे. यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास करावे असा मौलिक सल्ला दिला.
यंदाच्या शालांत प्रमाणपञ परीक्षा मार्च २०२० चा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, गोकुंदा या शाळेंनी उज्वल यशाची परंपरा कायम राखत ९५.५५ निकाल दिला आहे. आणि सेमी इंग्रजी माध्यमाचा १०० % निकाल लागला आहे. त्यात प्रियांशू अरविंद राठोड ह्या विद्यार्थ्यांने ९५ %गुणासह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर हिमांशू अरविंद राठोड या विद्यार्थ्यांने ९३ % गुणासह द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आणि कु. महेविश शाकिर सय्यद हिने ९१%गुणासह तृतीय क्रमांक पटकावला आहे. शाळेचा एकुण निकाल समाधानकारक असुन त्यात १५ विद्यार्थी विशेष प्रावीण्य सह उत्तीर्ण तर ९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. १४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण तर ६ विद्यार्थी तृतीय श्रेणी सह उत्तीर्ण झाले आहेत. वडिलांचे छायाछञ हरवलेली विद्यार्थीनी कु. भाग्यश्री चप्पलवार हिने ७७.४० % गुणांसह उत्तीर्ण झाल्याबद्दल अॅड. सचिन राठोड साहेबांनी अर्थीक स्वरूपात मदत करून विशेष अभिनंदन केले. शाळेचे मुख्याध्यापक अरविंद राठोड यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व उपस्थितांचे आभार मानले. तर अनंतवार सुनील सर यांनी सुञसंचलन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती तलवाडे जयश्री, श्रीमती वाठोरे मनिषा, श्री. सहेजाद खञी सर, श्री. शिंदे सर, प्रकाश रणवीर आदींनी परिश्रम घेतले.