मावळ (नितीन मधुकर कालेकर) : देशात कोरोना विषाणुने अक्षरशः धुमाकूळ घातला असुन. रविवारी कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३६ लाखांच्या पुढे गेला आहे.आतापर्यंत ३६ लाख १९ हजार १६९ नागरिकांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. तर चिंतेची बाब म्हणजे मृतांची संख्याही ६५ हजारांच्या जवळ आहे.
मावळ तालुक्यात पंचायत समितिचे दोन ग्रामसेवक व बांधकाम विभागाचे तीन शाखा अभियंता यांना कोरोनाची लागण झाल्याने भीती चे वातावरण झाले आहे,संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःला कोरंटाईन करून घ्यावे आणि त्रास होत असल्याचे कोरोनाची चाचणी करा असे आवाहन मावळ तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष शरद डोले यांनी केले आहे.
नितीन कालेकर जिल्हा प्रतिनिधी पुणे
जाहिरातीसाठी सम्पर्क-8551888031 /8830585920