Ticker

6/recent/ticker-posts

काल साने गुरूजी रूग्णालयात डायलेसीस युनिट कार्यान्वीत झाले. साने गुरूजी रूग्णालय परीवारासाठी ही अत्यंत आनंददायी घटना आहे. सा.गु.रू. परिवाराच्या भारत जोडो युवा अकादमी या संस्थेने सुरूवातीपासुनच या परीसरात अत्यंत आवश्यक मुलभूत व गरजेचे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला आहे. या परीसरातील जनतेची आरोग्य विषयक गरज लक्षात घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान एक –एक करून उपलब्ध करून द्यावे व येथील जनतेचे जीवनमान सुखकर करण्यास हातभार लावावा यासाठी संस्था व परीवार सातत्याने विचार करीत असते व त्यासाठीच आम्ही सर्व कटीबध्द आहोत


काल साने गुरूजी रूग्णालयात डायलेसीस युनिट कार्यान्वीत झाले. साने गुरूजी रूग्णालय परीवारासाठी ही अत्यंत आनंददायी घटना आहे. सा.गु.रू. परिवाराच्या भारत जोडो युवा अकादमी या संस्थेने सुरूवातीपासुनच या परीसरात अत्यंत आवश्यक मुलभूत व गरजेचे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला आहे. या परीसरातील जनतेची आरोग्य विषयक गरज लक्षात घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान एक –एक करून उपलब्ध करून द्यावे व येथील जनतेचे जीवनमान सुखकर करण्यास हातभार लावावा यासाठी संस्था व परीवार सातत्याने विचार करीत असते व त्यासाठीच आम्ही सर्व कटीबध्द आहोत.
ही बातमी फेसबुकवर टाकताच असंख्य लोकांनी या पोस्टला भरभरून प्रतिसाद दिला. (500 च्या वर लाईक्स, 150 च्या वर कॉमेंट्स आणि 10 शेअर करून आमचा उत्साह वाढविला आहे.) या सर्व सुविधांची गरज आपल्या परीसरासाठी आहेच पण सोबतच या परीसरातील सृजन व्यक्तींनी केलेले कौतुक, दिलेला पाठिंबा, घेतलेला सहभाग हा तेवढाच महत्वाचा आहे. आपणां सर्वांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. सोबतच सुचनांचाही आदर आहेच. 
भविष्यात या परीसरातील रूग्णांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोठ्या शहरात जावे लागू नये व आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची फळे येथील जनतेलाही चाखता यावी हा ध्यास घेऊन साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलची उभारणी एम.आय.डी.सी कोठारी किनवट येथे होत आहे. बांधकाम सुरूही झाले आहे. आपल्या सर्वांसाठी ही अत्यंत आनंदाची व दिलासा देणारी बाब आहे. आपण कौतुक तर करतच आहात सोबत या रूग्णालयाच्या उभारणीत सहभागीही व्हावे व योगदान द्यावे यासाठी कळकळीची विनंती व आवाहन करीत आहोत.