Ticker

6/recent/ticker-posts

अतिदूर्गम भागातील लेकरांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहचविण्यास सतत धडपडणारं व्यक्तिमत्व गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने -गटविकास अधिकारी सुभाष धनवे


अतिदूर्गम भागातील लेकरांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहचविण्यास सतत धडपडणारं व्यक्तिमत्व  गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने  -गटविकास अधिकारी सुभाष धनवे

किनवट / तालुका प्रतिनिधी : आदिवासी डोंगरी तालुक्यातील अतिदूर्गम वाडी -तांडा, पाड्या -गुड्यात वास्तव्य करणाऱ्या लेकरांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहचविण्यासाठी सतत धडपड करणारं व्यक्तिमत्व म्हणजे गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने होत, असे गोरोद्गार गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांनी काढले.
           येथून मंगळूरपीर ( जि. वाशिम ) येथे बदली झाल्याने गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांच्या निरोप समारंभाचा अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी निवृत्त गट शिक्षणाधिकारी अरूणकुमार वतनीवकील, शिक्षण विस्तार अधिकारी सुदर्शन मेश्राम, सूर्यकांत बाच्छे, संजय कराड, ना.ना. पांचाळ हे प्रमुख अतिथी उपस्थित होते. 
           पुढे बोलतांना श्री धनवे म्हणाले की, स्वतः त्यांनी अत्यंत हालाकिच्या परिस्थितीत शिक्षण घेतले म्हणून सर्वसामान्यांच्या हितासाठी ते सदैव प्रयत्नशील असत. निवडणूका व कोरोना काळात जनजागृतीसाठी आपल्या कलावंत शिक्षकांना घेऊन त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. नुतन गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांचे याप्रसंगी स्वागत करण्यात आले.
           शिक्षण विभाग आयोजित  कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख संघटनेचे तालुकाध्यक्ष रविंद्र जाधव यांनी केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी खुडे यांनी आभार मानले. शिक्षक कलावंत सुरेश पाटील यांनी ' अशी पाखरे येती ... ' हे निरोप गीत गाईले.
           यावेळी मंचावरील प्रमुख अतिथींसह केंद्र प्रमुख रमेश राठोड, एन. पी. पांचाळ, राम बुसमवार आदिंनी मनोगत व्यक्त केले.
          " सबका साथ , छात्रोंका विकास
           भविष्यात तालुक्यातून १०० आय.ए.एस. घडविण्याची पायाभरणी म्हणून स्पर्धा परिक्षेची पूर्व तयारी असलेली स्कॉलरशीप परिक्षा वर्ग नेटाने राबविण्यात येतील, सबका साथ, छात्रोंका विकास, या नव्या श्लोगणसह गुणवत्तेचा वसा घेऊया.
- अनिलकुमार महामुने,
नुतन गट शिक्षणाधिकारी,पं.स., किनवट "

" शिकवायची व शिकायची आवड होती. म्हणून प्रशासनातल्या बाबी शिकलो. कस्टोडियनची कामे सुद्धा केली. शिक्षक होतो म्हणून शिक्षकांच्या समस्या सोडवत होतो . म्हणून माझ्याविषयी कोणत्याही शिक्षक संघटनेची तक्रार नव्हती. किनवटला शिक्षण विभागाची खूप चांगली टीम आहे. या सर्वांनी उत्तम काम केलं म्हणून माझा गौरव झाला.
- सुभाष पवने,
गट शिक्षणाधिकारी, मंगरुळपीर "

यावेळी निरोप मूर्ती गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने व पुष्पा पवने यांना गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांचे हस्ते वस्त्र, भेटवस्तू व ग्रंथ भेट देण्यात आले. त्यानंतर जि.प.हा. कोसमेटचे मुख्याध्यापक बाळासाहेब गुंड, लक्ष्मण आढाव, दिगांबर शेंगेपल्लू, संजय कांबळे, बाबूराव इब्बितदार, शेख युनूस, आर.एम.कंतूलवार, येकाळे, इब्टाचे तालुकाध्यक्ष प्रमोद कांबळे, केशव पिल्लेवाड, सिताराम राचटवार, राम बुसमवार, निलावती गरुड, श्रीमती देगावे, गिरीधर नैताम, प्रकाश मुंडे, राजेश्वर जोशी, रमेश खुपसे आदिंनी ग्रंथ, शाल व पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला.
          कार्यक्रमाच्या यशास्वीतेसाठी सर्व केंद्र प्रमुख गट साधन केंद्राचे सर्व विषय तज्ज, उषा राठोड, त्रिगुणा कागणे, बाळू कवडे आदिंनी परिश्रम घेतले .