किनवट ता.प्र दि ५ किनवट तालुक्यात कोरोना विषाणुचा संसर्ग हा वेगाने वाढत आहे यामुळे प्रशासनाकडून किमान १० दिवसांचा लॉकडाउन लागु करण्याची नितांत आवश्यकता आहे तर कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावावर देण्यात आलेल्या दिशानिर्देश व शासकीय सुचनांचे, नियमांचे पालन नागरीकांकडुन झाले पाहिजे असे मत माजी आ.प्रदीप नाईक यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी पत्रकारांशी दूरध्वनी व्दारे बोलतांना त्यांनी मागणी केली की विविध गावातील व शहरातील स्थानिक प्रशासनाने नागरीकांना तोंडाला मास्कचे वापर करण्यास प्रवृत्त करावे ज्यामुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढणार नाही. शासकीय कर्मचा-यांनी किनवट – नांदेड ये-जा करु नये ज्या ठीकाणी नोकरी आहे त्याच ठीकाणी कर्तव्य बजाववावे त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होईल, नागरीकांच्या मनात कोरोना विषाणु बाबत गंभीरता दिसुन येत नाही त्यामुळे ते बाजारपेठ व शहरात बिनधास्त संचार करतात परंतु अनावश्यक रित्या शहरात संचार करणा-या नागरीकांना पायबंद केले पाहिजे तर नागरीकांनी देखिल अनावश्यक कारणासाठी घरातुन बाहेर पडु नये असे आवाहन माजी आ.नाईक यांनी नागरीकांना केले.
या बरोबर नागरीक त्यांना असलेल्या आजारा विषयी माहिती ही आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना देत नाहीत तर ज्या व्यक्तींना कोरोना विषाणुची बाधा झाली त्यांनी हि त्यांच्या संपर्कातील नागरीकांची व नातेवाईकांची माहिती ही आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना देणे अपेक्षित असते ज्यामुळे या विषाणुचा प्रादुर्भाव टाळला जाऊ शकतो. किनवट शहर व तालुक्यातील नागरीकांनी नांदेड येथिल आपले अनावश्यक प्रवास टाळावे जेणे करुन ते आपल्या कुटुंबाला या विषाणुच्या प्रादुर्भावातुन मुक्त ठेउ शकतील व काही दिवसात आरोग्य विभागाचे कर्मचारी हे प्रत्येकाच्या घरी येणार आहेत ते जेव्हा आपल्या घरी येथिल तेव्हा त्यांना सहकार्य करुन आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी व नागरीकांनी रोग प्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टीने आपली दिनचर्च्या ठेवावी, वाफ घेणे, आयुष मंत्रालयाकडुन सुचवण्यात आलेले आयुष काढा पिणे, दिवसातुन दोन ते दिन वेळा गरम पाणी पिणे, व्यायाम करणे, प्राणायम करणे, आपल्या परिसरात स्वच्छता राखणे या उपाय योजना आखल्यातर आपण कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या लढयात आपणाला लवकर यश प्राप्त होईल या करिता प्रशासनाने कडक पाऊले उचलली पाहीजे तरच नागरीकांचे आरोग्य चांगले राहतील
कोरोना हे साथ रोग असुन किमान १० दिवसा करिता संपुर्ण तालुका लॉकडाउन करण्यात आला तर या रोगावर मात करण्यात किनवट तालुक्यातील जनतेला यश प्राप्त होईल तरी प्रशासनाने यावर गंभीर होऊन काम केले पाहिजे व नागरीकांना या बाबत जनजागॄती केली पाहिजे.