*मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा च्या वतिने किनवट, इस्लापुर, शिवणी येथे जोरदार आदोंलन*
अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या पिंकाचे पंचनामे करुन तातडीने मदत करा - काॅ.अर्जुन आडे
मा.क.पा च्या वतिने २० आॅगस्ट रोजी देशव्यापी आंदोलनांची हाक देण्यात आली होती,मोदी सरकारच्या भांडवलदार आणि संविधान -धर्मनिरपेक्ष विरोधी धोरांना च्या विरोधात तथा सर्व सामान्य जनेतेच्या ज्वलंत प्रश्नाना घेऊन हे आंदोलन करण्यात आले.
किनवट ,इस्लापुर, आणि शिवणी येथे शेतकरी,महिला आदिंनी मोठ्या प्रमाणत आंदोलनात सहभाग घेतला, या वेळी आंदोलनाला संबोधित करतांना काॅ.अर्जुन आडे म्हणाले अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या सोयाबीन,मुग, उडीद पिकांचे पंचनामे करुन तातडीने मदत करा, तथा बँक कडून कर्ज वाटपास होणाऱ्या अडचणी सोडवून शेतकऱ्यांना जलद गतिने कर्ज वाटप करा असे मत या वेळी व्यक्त केले.
या आंदोलनाच्या माध्यमातून
सामान्य जनतेच्या अनेक मागण्या मांडण्यात आल्या,
अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन मदत करा.
ज्वारी- मका खरीदीचे पैसे शेतकऱ्यांना तातडणीने द्या.
हातावर पोट असलेल्या अॅटो चालक, गाडी वाले, विक्रेते, घरकामगार इत्यादी यांना दहा हजार मदत द्या.
बॅके कडून ताबडतोब कर्ज वाटप करावे, शेतकरी सन्मान योजनेचे पैसै न आलेल्या शेतकऱ्यांना तांञीक अडचणी सोडवून पैसै जमा करा,
वन जमिन, नवाटी कसणार्या शेतकऱ्यांना वन विभागाकडून नोटीस देने बंद करा,वन्य प्राण्याकडुन पिकांची झालेली नासधूस ची नुकसान भरपाई द्या,वन्य प्राण्यांच्या हल्यात जखमी झालेल्या लोकांना अर्थ साह्यय द्या,वीज बिल माफ करा, वाढीवी बिल आलेली रद्द करा,
कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी करुन द्या या मागण्या या वेळी करण्यात आल्या, आणि मागण्याचे निवेदन वन अधिकारी, वीज वितरण कंपणी व्यवस्थापक,बॅक मॅनेजर, तथा मंडळ अधिकारी यांना देण्यात आले. या वळी वन अधिकारी शिंदे साहेब, तलाठी हेंडगे साहेब, वीज वितरण कंपणीचे डुकरे साहेब,बॅक मॅनेजर यांनी निवेदने स्वीकारले!