Ticker

6/recent/ticker-posts

भरधाव वेगात जात असलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार;भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या वर काळाची झडप





भरधाव वेगात जात असलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार;भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या वर काळाची झडप

माहूर:-माहूर कडून किनवट कडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रक  ने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वारा चा जागीच मृत्यू झाला असून दुचाकी चकणाचुर झाली आहे.ही घटना आज दिनांक 02 रविवार रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास पालाईगुडा फाटा- करंजी चौफुलीवर घडली.

लॉक डाऊन मध्ये रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असताना घरचा उदरनिर्वाह चालवण्या साठी नागरिकासमोर अनेक प्रश्न उभे टाकले आहे.जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर गावागावात जाऊन गल्लीबोळात भाजीपाला विक्री करून दोन पैसे मिळवावे या प्रयत्नात असताना गंगाराम मेघा राठोड वय 50 रा.वानोळा ता.माहूर या भाजीपाला विक्री करणाऱ्यावर काळाने झडप घातली.

माहूर - किनवट राज्यमार्गावर ट्रक क्रमांक
एमएच 03 क्यू. 4804 माहूर च्या दिशेने भरधाव वेगाने येत होता.करंजी येथून भाजी पाला घेऊन वानोळा कडे जात असताना पालाईगुडा फाटा-करंजी चौफुली जवळ ट्रक ने दुचाकी ला जोरदार धडक दिली.त्यात चिरडल्याने गंगाराम मेघा राठोड वय 50 रा.वानोळा या इसमाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रकखाली येऊन दुचाकी चकनचुर झाली.
सिंदखेड पोलीस ठाण्याचे सपोनी मल्हार शिवरकर व पोलीस कर्मचारी यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला.भल्या पहाटे ही घटना घडल्याने
परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.