Ticker

6/recent/ticker-posts

*दैनिक लोकप्रश्न किनवट शहर प्रतिनीधी पदी जयश्री भरणे यांची निवड.*


*दैनिक लोकप्रश्न किनवट शहर प्रतिनीधी पदी जयश्री भरणे यांची निवड.*

*दैनिक लोकप्रश्न चे शहर प्रतिनीधी म्हणुन निवड झाल्यानंतर आपले मत व्यक्त करतांना जयश्री भरणे म्हणाले की, दैनिक लोकप्रश्न चे तालुका प्रतिनिधी आशिष शेळके सर यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला दैनिक लोकप्रश्न चे किनवट शहर प्रतिनीधी पदी निवड केल्याबद्दल प्रथम सरांचे मनस्वी आभार मानते. कारण पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये महिलांना प्राधान्य व पद दिलेले फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. पण आशिष सरांनी मला शहर प्रतिनीधी पदी निवडुन सिध्द केले की महिलांही कुठल्याच क्षेत्रात मागे नाहित आणि महिला सुध्दा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात. मी आशिष सरांचा हा विश्र्वास नक्कीच सार्थ करेल व पत्रकारितेच्या या क्षेत्रामध्ये अतीशय मेहनतीने, इमानदारीने व स्वाभिमानाने काम करेल. दैनिक लोकप्रश्न हा घराघरांत पोहचवेल व लोकांच्या समस्या व प्रश्न सदैव माझ्या लेखनीमधुन मांडण्याचा प्रयत्न करेल.*
      *जयश्री भरणे यांना दैनिक लोकप्रश्न किनवट शहर प्रतिनीधी चे ओळखपत्र देतांना राजुदादा शेळके, आशिष शेळके सर, भवरे सर, दयानंद काळे सर व गायकवाड सर ईत्यादि उपस्थित होते.*