Ticker

6/recent/ticker-posts

*शासनाच्या मुजोर धोरणा विरोधात भारीप प्रणीत वंचीत बहुजन आघाडी तर्फे किनवट येथे डफली बजाव आदोंलन


*शासनाच्या मुजोर धोरणा विरोधात भारीप प्रणीत वंचीत बहुजन आघाडी तर्फे किनवट येथे डफली बजाव आदोंलन*
दि .१२ ऑगष्ट
किनवट शहर प्रतिनीधी(राजेश पाटील) आज की न्यूज़:)

वंचीत बहुजन आघाडीचे संस्थापक सर्वेसर्वा अॅड. बाळासाहेब आबेंडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये मुजोर शासनाच्या धोरणा विरोधात "डफली बजाव आदोंलन" १२ ऑगष्ट रोजी पुकारण्यात आले होते यामध्ये किनवट येथील बसस्थानक परीसरात वंचित बहुजन आघाडी किनवटच्या वतीने डफली बजाव आदोंलन करण्यात आले राज्यभरातील एसटी महामंडळ सेवा, महानगरातील सार्वजनीक वाहतुक सेवा सुरू झाल्या पाहीजे व ज्यांचे हातावर पोट आहे अशे छोटे मोठे व्यापारी, उद्योजक, व्यवसायीक , गरीब कामगार यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे अनेक लोक लॉकडॉऊन मुळे अडकुन पडले आहेत कोरोनाच्या नावावर आरोग्य विभागात काळाबाजार होत आहे मानवी अवयव तस्करी होताना दिसून येत आहे त्यामुळे लॉक डॉऊन शिथील करून जनतेवरील अन्याय थांबवा या विवीध मागण्यासाठी हे आदोंलन पुकारण्यात आले या डफली बजाव आदोंलनामध्ये वंचीत बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र शेळके, व. ब.आ.सचिव दिपक ओंकार, सुरेश जाधव जिल्हा उपाध्यक्ष , अक्रम खान , दयानंद काळे, मिलींद वाठोरे, राजु नरवाडे, विशाल नवरंगे आदी पदाधीकारी सहभागी झाले होते आदोंलना नंतर पोलीस निरीक्षक पो. स्टे. व एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक मिलींद कुमार सोनाळे यांना निवेदन देण्यात आले .