किनवट ता.प्र दि ७ किनवट माहुर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनावर १५ वर्ष अधिराज्य गाजवलेले माजी आ.प्रदीप नाईक यांना मतदारसंघातील नागरीकांच्या गरजांची जानिव आहे किनवट तालुक्यात वाढती कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता कोरोना करिता निर्माण करण्यात आलेले कोविड केअर सेंटर मध्ये दाखल झालेल्या रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणुण व रुग्णांच्या सोई करिता संबधित डॉक्टर शी सल्ला संमत करुन परिस्थितीचा आढावा घेत किनवट च्या कोव्हिड केअर सेंटर ला एका वाशिंग मशिन, एक गिझर, भेट देऊन अधिक काही गरजा संदर्भात आपण पाठपुरावा करु असा विश्वास देत किनवट मतदारसंघातील नागरीकांनी सध्या सावधगीरी बाळगुन प्रशासनाच्या सुचनेचे तंतोतंत पालन करावे व आपणास व आपल्य कुटुंबियांना या महाभयंकर रोगापासुन दुर ठेवावे असे ही आवाहन माजी आ.प्रदीप नाईक यांनी केले.
सध्या किनवट तालुक्यात कोरोना या महाभयंकर रोगाने डोके वर काढले असुन दैनंदिन वाढती रुग्णांची संख्या यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याने माजी आ.प्रदीप नाईक यांनी किनवट मतदारसंघातील जनतेला आव्हाण केले कि गरज असल्यावरच घराबाहेर पडा, गर्दीच्या ठीकाणी जाणे टाळा पाहुण्याकडे बाहेर गावी जाणे टाळा, तोंडाला मास्क बांधा, कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होऊ नका असल्या सुचना देत प्रशासनाकडुन ज्या ज्या वेळी सुचना प्राप्त होतील त्यासुचनेचे तंतोतंत पालन करा सध्या मी स्वतः माझा परिवार , माझा परिसर, माझा गाव, सुरक्षित राहायला पाहिजे याकडे प्राधान्य द्या असे ही आवाहन मा.आ.नाईक यांनी केले किनवट येथिल नविन तहसिल कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या कोविड केअर सेंटर येथे रुग्णांचे वापरलेले चादर धुण्यासाठी अत्याधिनिक दर्जाची एक वासिंग मशिन व तेथिल रुग्नांना स्नान करण्यासाठी व वापरण्यासाठी गरम पाणी गरजेचे असल्याने एक गिजर भेट देऊन यापुढे याठीकाणी व ईतर मतदारसंघात कुठेही रुग्णांच्या सोई साठी गरज भासल्यास आपण त्या ठीकाणी सहकार्य करु असे आस्वासन तहसिलदार उत्तम कागणे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्य्किय अधिक्षक डॉ.धुमाळे, ता.वैद्यकिय अधिकारी संतोष मुरमुरे यांच्याशी भ्रमणध्वणीवर संवाद साधतांना दिले. यावेळी डॉ.भाग्यश्री वाघमारे, डॉ आशिष डुडुळे, डॉ.केंद्रे, डॉ माने, श्रीकांत माने आदिंसह पत्रकार यांच्या उपस्थितीत वाशिंग मशिन व गिझर भेट देण्यात आले.