Ticker

6/recent/ticker-posts

(पुणे प्रतिनिधि आज की न्यूज़ )पुणे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे ग्रामीण भागात उद्भवलेल्या परिस्थितीची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ▪️

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे ग्रामीण भागात उद्भवलेल्या परिस्थितीची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 
▪️मावळ तालुक्यात रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्ण संख्येच्या तुलनेत व्हेंटिलेटर अपुरे पडत आहेत. मावळ तालुक्यासाठी अधिक व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावेत.
▪️ कोरोनाच्या गंभीर रुग्णांना जीवनदायी ठरणारे इंजेक्शन, औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने जिल्हा परिषदेने तातडीने आवश्यक औषधे उपलब्ध करून द्यावीत.
▪️ सर्वसामान्य रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळत नसून या योजनेचा कोविड रुग्णांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 
▪️पिंपरी चिंचवड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या मावळ तालुक्यातील कोविड रुग्णांना मोफत उपचार मिळावे अशा प्रमुख मागण्या या बैठकीत केल्या.
मा.अजितदादांनी सर्व मागण्यांचा विचार करत सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

या वेळी कामगार मंत्री मा.दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आमदार दिलीप आण्णा मोहिते, आमदार संजय जगताप व इतर अधिकारी उपस्थित होते.
#sunilshelke #maval #WarAgainstVirus #FightAgainstCorona #coronawarriers