Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष यांनी अचानक केला किनवट दौरा. प्रतिनिधी / किनवट : वंचित बहुजन आघाडी चे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अभियंता प्रशांत ईगोंले यांनी दिनांक १ आॅगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता अचानक किनवट तालुक्याचा दौरा करुन वंचित बहुजन आघाडी चे किनवट तालुका अध्यक्ष राजेंद्र शेळके व इतर पदाधीकारी व कार्यकर्ते यांची भेट घेतली.





वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष यांनी अचानक केला किनवट दौरा.

प्रतिनिधी / किनवट : वंचित बहुजन आघाडी चे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अभियंता प्रशांत ईगोंले यांनी दिनांक १ आॅगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता अचानक किनवट तालुक्याचा दौरा करुन वंचित बहुजन आघाडी चे किनवट तालुका अध्यक्ष राजेंद्र शेळके व इतर पदाधीकारी व कार्यकर्ते यांची भेट घेतली.
         वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रशांत ईगोंले यांचे किनवट येथे आगमन होताच वंचित चे किनवट तालुका अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बोलावून गोकुंदा येथील विद्यानगर च्या सार्वजनिक सभागृह मध्ये बैठक बोलावली. सर्वप्रथम सभागृह मध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मग प्रशांत ईगोंले यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. नंतर बैठकीला सुरुवात करण्यात आली.
           बैठकी मध्ये प्रशांत ईगोंले यांनी राजेंद्र शेळके सोबतच इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत चर्चा केली. सर्वांचे मत व किनवट तालुक्यातील समस्या जाणून घेतल्या. मग प्रशांत ईगोंले यांनी सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा करताना पक्ष बांधनी विषयी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच पुढील निवडणूका लवकरच येणार आहेत म्हणुन ते लक्ष डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा असे प्रशांत ईगोंले म्हणाले.
          पत्रकारांशी बोलताना वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी म्हटले की, जिल्हाध्यक्ष यांनी अचानक भेट देऊन सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना काम करण्याची उर्जा दिली आहे. आतापर्यंत लाॅकडाऊन मध्ये हि किनवट तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी चे काम चालुच होते पण आता जिल्ह्याध्यक्ष यांनी सर्वांची प्रत्यक्ष भेट घेतल्यामुळे आता नविन जोमाने व नविन उर्जेने वंचित बहुजन आघाडी किनवट मध्ये काम करेल. सामाजिक व राजकीय कामाबरोबरच पक्ष बांधणीसाठी जोमाने काम करु असे सांगितले.
          बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी चे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अभियंता प्रशांत ईगोंले, वंचित चे किनवट तालुका अध्यक्ष राजेंद्र शेळके, वंचित चे किनवट महासचिव दिपक ओंकार, मिलींद वाठोरे, दयानंद काळे, दया पाटिल, संघपाल शेळके, धम्मा कोसरे, राजु नरवाडे, अमर शेळके, संजय मुकाडे, अजिस पठान, प्रमोद कोसरे, विकास वाघमारे, विशाल नवरंगे, पुनित मंत्रीवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.