Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता.प्र दि ६ इंटरनॅशनल लॉयन्स क्लब नेहमी मानवी सेवेला प्राधान्य देत आलेले आहेत अशा सेवाभावी क्लबच्या माध्यमातुन संकट काळात तथा आरोग्य सेवा कार्यासह



किनवट ता.प्र दि ६ इंटरनॅशनल लॉयन्स क्लब नेहमी मानवी सेवेला प्राधान्य देत आलेले आहेत अशा सेवाभावी क्लबच्या माध्यमातुन संकट काळात तथा आरोग्य सेवा कार्यासह अनेक उपक्रम राबवितात लॉयन्स क्लबची परंपरा जपण्याचे महान कार्य अविरत पणे चालु आहे कोविड १९ कोरोना वैश्विक महामारी संकटात किनवट लॉयन्स क्लब मिडटाऊन नविन कार्यकारणी आपले योगदाना करिता सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन लॉयन्स क्लब किनवट चे मा.अध्यक्ष सिनियर लॉ.के.मुर्ती यांनी केले.
      किनवट येथे पदमजा मोटर्स या शोरुम येथे ५ ऑगस्ट रोजी सोशल डिस्टस्टींगचे नियम पाळत किनवट लॉयन्स क्लबची नविन कार्यकरणी पदग्रहण समारोह आयोजित करण्यात आले. या प्रसंगी लॉ.के.मुर्ती हे बोलत होते.
      प्रारंभी राष्ट्रगीता नंतर कोविड १९ कोरोना वैश्विक महामारी भिषण संकटात अहोरात्र आरोग्य सेवा देणा-या कोविड योध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तर नंतर नविन कार्यकारणी अध्यक्ष पदी लॉ.व्यंकट नेम्मानिवार, सचिव लॉ.गौरव ईटकेपेल्लीवार, कोषाध्यक्ष लॉ.अनुप कंचर्लावार, उपाध्यक्ष लॉ.चेतन पंड्या, लॉ.अभय नेम्मानिवार यांना शपथ देण्यात आली यावेळी नगराध्यक्ष लॉ.आनंद मच्छेवार, लॉ.साजिद खान, लॉ.श्रीनिवास नेम्मानिवार, लॉ.राघवेंद्र जैस्वाल आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष पद ग्रहण केल्या नंतर लॉ.व्यंकट नेम्मानिवार म्ह्णाले कि लॉयन्स क्लबची समाज सेवेची परंपरा जोपासत या कोरोना काळात सुध्दा सेवा देण्याकरीता कटीबध्द राहुन सर्व लॉयन्स सदस्यांना सोबत घेऊन कार्य करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन सुनिल राव आयनेलीवार यांनी तर आभार लॉ.नरसिंगराव नेम्मानिवार यांनी मानले या नविन कार्यकारणी पदग्रहण सोहळ्यात शासनाच्या कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावा बाबत असलेल्या विविध दिशानिर्देशाचे पालन करण्यात आले तर प्रत्येकांच्या तोंडाला मास्क व हातत सॅनिटायझर ची व्यवस्था होती व नेहमी मोठ्या थाटात होणारा हा सोहळा यावेळी अगदी साधे पणाने करण्यात आला तर लॉ.सुनिल राव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन या पदग्रहण सोहळ्यात त्यांना वाढदिवस देखिल साजरा करण्यात आला.