Ticker

6/recent/ticker-posts

वंचित आघाडी पार्टी ने लॉगडॉन नहीं बढ़ाया जाए ऐसा निवेदन दिया गया है नांदेड के फारूक अहमद ने




रस्त्यावर येऊन लाॅकडाऊनच्या विरोधात कायदेभंग आंदोलन करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

नांदेड(दि.03) छोटे व्यापारी व होकर्सवर कोविड-19 अंतर्गत कारवाई केल्यास रस्त्यावर उतरून कायदेभंग करण्याचा इशारा नांदेड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज नांदेड पोलीस अधीक्षक यांना भेटून एका निवेदनाद्वारे देण्यात आला.
        कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी 22 मार्च ते आजपर्यंत लाॅकडाऊनच्या नावाने ऑटोरिक्षा, चालक,पानटप्प-या व चहाच्या टपऱ्या तसेच फराळाच्या व तहारीच्या छोट्या हाॅटेल्सवर विविध नियमांचा आड मुक्तपणे व्यवसाय करण्यापासून रोखण्यात येत आहे. या व्यवसायीकांच्या उदरनिर्वाहाचे माध्यम पूर्णतः बंद असून एक ऑगस्ट नंतर लाॅकडाऊन न करता जगण्याचा मुलभुत हक्कासाठी सर्व कामगार, छोटे-मोठे व्यापारी व हाॅकर्सवरचे निर्बंध उठविण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे.
    त्या अनुषंगाने आज नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण विभागाच्या महानगरच्या वतीने नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक मगर यांना भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी भंदत महाथेरो पंय्याबोधी, प्रदेश प्रवक्ते फारूख अहमद आदीची प्रमुख उपस्थिती होती.
    शासन स्वतः  आरोग्य सुविधाची कमतरता अपयश लपविण्यासाठी लोकांना लाॅकडाऊनच्या निर्बंधामध्ये कैद  करण्याचा सपाटा लावला आहे. असा आरोप प्रस्तुत निवेदनात करून एकीकडे दारू दुकानावर प्रचंड गर्दी होत आहे.तर शासन चित्रपट गृह व जिम सुरू करित आहे. पंरतु तळहातावर पोट असलेल्या कष्टक-यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे.वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ह्या व अशा सर्व घटकांना पूर्ण वेळ व्यापार सुरू करण्याचे आव्हान केले आहे. संविधानिक मूलभूत अधिकाराच्या संरक्षणार्थ व मानवतेच्या दृष्टिकोनातून या व्यावसायिकांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रस्त्यावर येऊन तीव्र कायदेभंग आंदोलन करण्यात येईल व कायदा सुव्यवस्था बिघडल्यास यांची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील असा इशारा निवेदना व्दारे देण्यात आला.या निवेदनावर उत्तरजिल्हा महासचिव प्रा साहेबराव बेळे,उत्तर महानगराध्यक्ष आयुब खान,दक्षिण महानगराध्यक्ष विठल गायकवाड, अशोक कापसीकर,उन्मेश ढवळे,संदीप वने,कनिष्क सोनसळे, आतिश ढगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.