Ticker

6/recent/ticker-posts

गणपती बप्पा मोरया…!!! १८९३ पासुन लोकमान्य बाळ गंगाधर टीळक यांच्या संकल्पनेतून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकांच्या जनजागृती करण्याकरिता सार्वजनिक रित्या गणेशोत्सव साजरा करण्यास प्रारंभ झाला ती त्या काळाची गरज होती त्यामुळे त्यावेळी स्वातंत्र्यलढा लढण्याकरिता स्वातंत्र्य योध्दे तयार झाले, तर आज कोरोना विषाणूचे संकट आलेले असल्याने सार्वजनिक साजरा होणारा गणेशत्सव हा घरात साजरा करणे गरजेचे झाले आहे ही आजच्या काळची गरज आहे. कारण कोरोना विषाणुच्या लढयात आपणाला कोरोना योध्यांची आवश्यकता आहे


सौ. संध्या राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णालयात हैंडग्लोज चे वाटप
माहूर 
 येथील बळीराम पाटील मिशन मांडवी च्या सचिव तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणी सदस्या सौ. संध्याताई प्रफुल्ल राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालयात 'कोविड योद्धा ' अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हैंडग्लोज चे वाटप करण्यात आले.
 कोरोना महामारीचे दुष्परिणाम आता किनवट माहूर तालुक्यात दिसून येत आहे  तसेच राठोड परिवारातील सदस्याच्या आकस्मिक निधनाने परिवार अजून दु:खातून पूर्णपणे सावरलेला नसतांना दि 24 आॅगस्ट रोजी स्वतःचा वाढदिवस हर्षोल्हासात साजरा न करण्याच्या आवाहनास प्रतिसाद देवून बॅनर, हार ,तुरे, शाल, पेढे, इत्यादीवर अनावश्यक खर्च न करता  ग्रामीण रूग्णालयास आवश्यक त्या वस्तू देण्यात आल्या.
    याप्रसंगी रूग्णालयातर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्यंकटेश भोसले , भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष देवकुमार पाटील, युवानेते अॅड. रमण जायभाये,  भाजपा जिल्हा सदस्य तथा पत्रकार विजय आमले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन जे एम रेड्डी प्राचार्य बाबासाहेब राठोड , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.