Ticker

6/recent/ticker-posts

*भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी निवड केल्याबद्दल मनस्वी आभार...!*doctor ashok suryavanshi




किनवट (प्रतिनिधी) नसीर त गा ले)
किनवट विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला अच्छे दिन प्राप्त करून देऊन नगरपरिषद,पंचायत समिती व विधानसभेवर  भाजपाचे निर्विवाद वर्चस्व स्थापन करणारे निष्ठावान, निष्कलंक नेते अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या कार्याची व परिश्रमाची दखल घेऊन पक्षाने त्यांची प्रदेश कार्यकारिणीच्या निमंत्रीत सदस्य पदी नियुक्ती केली असून  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी निवडीचे  पत्र नुकतेच जारी केले आहे.
या निवडीबद्दल किनवट मतदार संघातील भाजप पदाधिकारी व  कार्यकर्त्यांनीआनंद साजरा करत अशोक पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
सलग 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची
एक हाती सत्ता असलेल्या किनवट मतदारसंघात भारतीय जनता पार्टी अस्तित्वहीन झाली होती.दरम्यान अशोक पाटील सूर्यवंशी या मतदारसंघात पाय रोवल्यानंतर भाजपाचे खऱ्या अर्थाने अच्छे दिन सुरू झाले. त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे अल्पशा कालावधीत सबंध मतदारसंघात भाजपाचे वारे वाहू लागले.पक्षाच्या निर्देशानुसार तसेच वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक पाटील सूर्यवंशी यांनी प्रथमता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत नियोजन बद्ध रणनीती आखून पंचायत समितीवर पक्षाचे निर्विवाद वर्चस्व स्थापन करुन राष्ट्रवादीच्या गडाला सुरूंग लावला. जिल्हा परिषदेतही दोन जागा जिंकून त्यांनी जिल्ह्याचे लक्ष वेधले. त्यानंतर झालेल्या किनवट नगर परिषदेच्या निवडणुकीतही एक हाती सत्ता मिळविण्याचे श्रेय अशोक पाटील सूर्यवंशी यांना जाते. किनवट मध्ये दाखल होण्यापूर्वी या मतदारसंघात भाजपाला मोठ्याप्रमाणात मरगळ आली होती.परंतु अशोक पाटील यांच्या रूपाने या मतदारसंघात पक्षाचा बोलबाला सुरू झाला.आपल्या कुशाग्र बुद्धीने राजकीय चमत्कार घडविल्या नंतर पक्षाच्या मुख्यालयात अशोक पाटील यांचे स्थान बळकट झाले दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार होते मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.परंतु पक्षाचे हित लक्षात घेऊन त्यांनी   जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पक्षाचे आमदारकी मिळविण्याचे स्वप्न पूर्ण केले.त्यांच्या या कार्याची प्रदेश कार्यालयाने दखल घेतली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी अशोक पाटील सूर्यवंशी यांना प्रदेश कार्यकारिणीच्या निमंत्रित सदस्य पदी नियुक्त केले असून तसे पत्र जारी केले आहे.अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या निवडीबद्दल किनवट माहूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.